शिराळा कोकरूड मार्गावरील पावलेवाडी

मनोजकुमार मस्के - चिखली
शिराळा कोकरूड मार्गावरील पावलेवाडी घाटात गेल्या दोन-तीन महिन्यापुर्वी दरड कोसळले असुन अजून पर्यंत ढिगारा हटवला नसल्यामुळे या ठिकाणी एकेरी वाहतूक करावी लागत आहे. चालकांना मोठी वाहने तर मोठ्या कसरतीने चालवावी लागत आहेत.  हे करताना वाहनचालकांना घाटातून जीवघेणे कसरत करावी लागत आहे.  शिराळा पश्चिम परिसरात नेहमीच जोरदार पाऊस पडत असल्याने  पावलेवाडी घाटात मोठ्या मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. अती पावसामुळे दरवर्षी भूस्खलन व दरड कोसळण्याच्या घटना पावसाळ्यात वारंवार घडत असतात. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही व ठोस उपाययोजना  करत नाही. आता तर घाटांमध्ये दरडी चा मोठा भाग रस्त्यावर कोसळला असून मातीचा ढिगारा तसाच पडून असल्यामुळे मोठ्या वाहनांना कसरत करावी लागत आहे. दरड कोसळते वेळी वाहतूक कमी असल्याने कोणतीही हानी झाली नाही. सध्या शिराळा कोकरूड रस्त्याचे काम सुरू आहे पावलेवाडी ते शांतीनगर काम ठेकेदाराकडून संथ गतीने नियोजनशून्य व निकृष्ट दर्जा ने सुरू असल्याचा फटका घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना बसतो आहे.  ठेकेदारावर कोणाची देखरेक नसल्याने आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध असतानाही रस्त्यावर खडी अस्तव्यसत  पसरली आहे. शिवाय कोकरूड पासून केलेल्या  कामाच्या दर्जाचा प्रत्यय जागोजागी स्पष्ट दिसत आहे. रस्त्याचे काम सुलभ पणे होत नाही तसेच रस्त्याची एक बाजू पूर्ण करणे आवश्यक असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठिकाणी रस्ता   खोदून ठेवला आहे. धोक्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सूचना फलक लावलेले नाहीत. पावलेवाडी येथे गावातुनच रस्ता खोदला असल्याने रात्रीच्या वेळी वाहण चालवणे जिगीरीचे आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या मोरीची कामेही निकृष्ट झाली आहेत.  डोंगराच्या बाजूने नाले नसल्यामुळे डोंगरावरून येणारे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. जागोजागी रस्ता करून ठेवला आहे त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून पावलेवाडी ते शिराळा प्रवास करताना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे

फोटो - पावलेवाडी येथे दरड कोसळली असुन दोन महिने झाले याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे.

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*