उमद्या मनाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईकसाहेब- मधुकर भावे


मधुकर भावे

१६ आॅक्टोबरला श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत चुकीच्या वक्तव्यावर  लिहील. त्याचा ‘कोलाज’ खाली टाकला आहे. १७ आॅक्टोबर, १८आॅक्टोबरला पुणे आणि कराडला होतो. त्या दोन दिवसात श्री. फडणवीसांवरील लेखाबद्दल सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ११.३0 पर्यंत असंख्य फोन आले. राजकारणात असलेल्या कार्यकर्त्यांचे आले. कॉंग्रेस-राष्ट्रवादीतल्या अनेकांचे फोन आले. पण जे राजकारणात नाहीत, अशा असंख्य लोकांचे फोन आले. अगदी तपशीलात सांगायच तर ८५0 पर्यंत हा आकडा जातो. लोकांच्या मनात जे असेल ते लिहीलं तर, प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. जोधपूरचे डॉ. गोवर्धनलाल पराशर यांची ‘दो अंगुठे की कमाल’ 
३१ जानेवारी २0२१ रोजी लिहील्यानंतर आतापर्यंत १६ ते १७ हजार रुग्ण जोधपूरला जावून बरे झाले. फडवीसांच्या लेखाबद्दल अजून फोन येत आहेत. माझ त्यांच्याशी व्यक्तिगत भांडण काहीच नाही.  त्यांचे वडील गंगाधर राव फार प्रेमळ माणूस होते. त्यांच्या घरी नागपूरला वामनराव परब, मधु देवळेकर, यांच्यासह त्यांच्या प्रिय मातोश्रींच्या हातच सुग्रास भोजनही घेतलेलं आहे. तेव्हा देवेंद्रजी ७ वर्षांचे होते. मुद्दा व्यक्तिगत टीकेचा कुठेच नाही. जे  नेते पदाने मोठे झाले आहेत, त्यांनी वरच्या पायंडीवर रहावं. खाली उतरु नये. जमल तर, खालच्या पायंडीवर असलेल्याला वर घ्यावं. सध्या फडणवीस, चंद्रकांत पाटील ही जोडी नेमकं उलट वागते आहे. म्हणून लिहीलं. आलेल्या एकूण फोनमध्ये एकही फोन ‘तुम्ही  चुकीच लिहीलंत...’ असं म्हणणारा कोणीही नव्हता. मी भाजपाचा कट्टर विरोधक. आजचा नव्हे, भाजपा जनसंघ होता तेव्हापासून. यांच राजकारण देशात ‘जे प्रश्न नाहीत’ त्याला ‘मोठा प्रश्न’ बनवून त्याच्या भोवती लोकांना गुंतवून ठेवायच मग बेकारीचे, महागाईचे, रोजगाराचे सगळे प्रश्न आपोआप बाजूला पडतात. हे आजच नाही, अनेक वर्षांच आहे. या लेखाचा तो विषय नाही. विषय वेगळा आहे. भाजपामध्ये आदरणीय अटलजी, आदरणीय नितीन गडकरी, महाराष्ट्राच्या राजकारणात रामभाउ म्हाळगी, रामभाउ कापसे, रामभाउ नाईक हे तीन राम, माझे कायमचे आदराचे आहेत. वामनराव परब, मधू देवळेकर,  हाशूजी हे नेते आदळ-आपट करणारे नव्हते. रामभाउ म्हाळगींना तर आमदार म्हणून तोड नव्हती. आता ती माणसं राहीली नाहीत. फडणवीस-पाटील जोडीने नवीन धटींगणापणा आणला. त्यामुळे वैचारिक चर्चाच संपली. यापैकी कोणाच वाचन नाही. पूर्व परंपरा माहित नाही. ते सगळ शरद पवारसाहेबांकडून शिकावं. 
परवा लेख प्रसिध्द झाल्यावर पहिला फोन आला, उल्हास पवार यांचा. त्यांनी सांगितलं ‘शक्य आहेत तेवढ्यांना पाठवला...’ ‘पण मित्रा... एक नाव राहीलंय..’ वसंतराव नाईकांच. मी शरमिंदा होवून म्हणालो. उल्हासदादा, ही चूक मान्य आहे. नाव तोंडावर होतं पण ज्योती बसू, सुखाडिया, प्रतापसिंग कैरो, रामचंद्रन या मुख्यमंत्र्यांची नाव सांगता- सांगता नाईक साहेबांच नाव एकदम विसरुन गेलो. अलिकडं असं रोज होतं. चेहरा समोर दिसतो पण त्या माणसांच नाव विसरतो. काय झालय माहित नाही. ८२ वर्षे वय झालं म्हणून वयाचा परिणाम असेल तर, तो माझा पराभव आहे. नाईकसाहेबांच नाव राहीलं म्हणून जाहीरपणे क्षमा मागतो. ५ डिसेंबर १९६३ ते २0 फेब्रुवारी १९७५ एवढ्या काळात म्हणजे साडेअकरा वर्षे ते सलग मुख्यमंत्री होते. महाराष्ट्र घडविण्यात त्यांचा फार मोठा वाटा. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी मंत्री शंकरराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते, राजारामबापू, रफिक झकेरिया सगळे दिग्गज मंत्री होते. १९६0 ते १९८0 या २0 वर्षांत महाराष्ट्रात जे काही घडलं त्याला तोड नाही. ३१ मोठी धरण (त्यात उजनी, जायकवाडी, पेंचसुध्दा) ३५0 मध्यम धरणंं, ३ हजार छोटी धरणं (लघू पाटबंधारे).. कोराडीच औष्णिक केंद्र, चंद्रपूर, पारस, येलदरी सगळी औष्णिक केंद्र (कोयना धरण नाईकसाहेब येण्यापूर्वीच, यशवंतरावांच्या काळातलं, त्यावेळचे बांधकाम मंत्री मालोजीराव निंबाळकर आणि नंतर बाळासाहेब देसाई यांच्या काळातलं)...कोयना सोडून बाकी सगळा विकास नाईक साहेबांच्या काळातला. २५ हजार खेड्यांच विद्युतीकरण त्यांच्याच काळातलं. जिल्हापरिषद निर्मिती यशवंतरावांमुळे झाली. देशात जिल्हा परिषदेचा निवडून आलेला पहिला अध्यक्ष यशवंतरावांनी महाराष्ट्रात बसवला ५ मार्च १९६२ला. पण त्या जिल्हापरिषदेचा १९३ पानांचा अहवाल वसंतराव नाईक महसूलमंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेला.  रोजगार हमी योजना नाईकसाहेबांच्या काळात अंमलात आलेली. नवी मुंबई योजना त्यांचीच (रफिक झकेरिया), एकाधिकार कापूस खरेदी त्यांच्याच काळातली (यशवंतराव मोहिते मंत्री). मुंबईतल्या जुन्या ४00 चाळीची घरदुरुस्ती मंडळामार्फत (म्हाडा) निर्मिती नाईकसाहेबांच्या काळातील. मंत्री यशवंतराव मोहिते. शेतकºयांच्या शेतात असलेल्या झाडांची मालकी सरकारची होती. जमिनीचा मालक शेतकरी पण झाडांची मालकी सरकारची. नाईकसाहेबांच्या काळातच  ही मालकी शेतकºयांची झाली (मंत्री राजारामबापू..) 
महाराष्ट्राचा असा झपाट्याचा विकास १९८0 नंतर पुढच्या ४0 वर्षांत झालेला नाही. उडडाणपूल झाले असतील. शहर चकाचक झाली. पण खेड्यात रखरखाट आहे. हे सगळं त्यावेळच वैभव नाईकसाहेबांच्या काळातलं. पुन्हा वाद न करता विरोधकांचा आदर करुन आणि ‘मीच पुन्हा येईन ’ असं न म्हणतात आणि त्याही पलिकडे जावून ज्या दिवशी नाईकसाहेबांना राजीनामा देण्याच दिल्लीहून सांगण्यात आलं, त्यादिवशी ते पुण्यात होते. १८ फेब्रवारी १९७५ ची घटना. भाषण चालू असतानाच त्यांच्या हातात पीटीआयच्या बातमीचा कागद देण्यात आला. शांतपणे ते म्हणाले... ‘महाराष्ट्राने मला भरपूर दिलं आहे, माझी कसलीही तक्रार नाही. मुंबईला गेल्यावर राजीनामा देतो...’ रात्री ते मुंबईला आले. राजीनामा दिला, मावळत्या मंत्रीमडळाला त्याच दिवशी रात्री ‘वर्षा’ बंगल्यावर राजीनामा देणाºया मुख्यमंत्र्यांनी भोजनासाठी आमंत्रित केलं. उद्या होणारे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना पुष्पहार घालून, कडकडून मिठी मारली आणि नाईकसाहेबांच्या चेहºयावर हसू असं होतं की, जणू उद्या त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायची आहे.... या ठिकाणी ते ज्या दिवशी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले (५ डिसेंबर १९६३) त्या दिवशी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना पुष्पहार घातला. त्यावेळचा त्यांचा चेहरा पाहा आणि राजीनामा द्यावा लागल्यावर, येणाºया मुख्यमंत्र्यांचा सत्कार करताना चेहरा पाहा... नेत्यानं किती उमद असावं, हे या दोन फोटोमधून शिकावं... हेच सांगण्यासाठीच आज हे लिहील. शिवाय 
१६ आॅक्टोबरच्या लेखात नाईकसाहेबांच नांव राहील त्याची दोन दिवस मनात रुखरुख होती म्हणून क्षमा मागून आज लिहीलं. माझ्या संग्रहातले हे फोटो शोधून काढले... फडणवीसांसाठी नाही. पुढच्या पिढीनं हे पहावं, उमदं कसं रहावं, हे शिकावं.
जाता जाता शेवटचा मुद्दा...
त्या दिवशीचा लेख पवारसाहेबांवरही होता. आणखी एक उमद्या मनाची घटना सांगतो. १९७८ साली पवारसाहेबांच पु.लो.द सरकार चांगलं चाललं होतं. बहुमत होतं. १४ जानेवारी १९८0 रोजी श्रीमती इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. १७ फेब्रुवारी १९८0 रोजी महाराष्ट्रात ‘राष्ट्रपती राजवट’ लावण्यात आली. त्यावेळी वानखेडे स्टेडीयमवर भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी सामना चालू होता. कॅप्टन अ‍ॅलन बॉर्डरच शतक होणार होत. पवारसाहेब सामना पाहत होते. त्यांचे सचिव श्री.धुवाळी पी.टी.आय.ची बातमी घेवून आले. सरकार बरखास्त केलं होतं. पवारसाहेबांच्या हातात बातमीचा कागद दिला... पवारसाहेब म्हणाले,.. ‘चला, आता उठायची घाई नाही, सामना पूर्ण बघता येईल...’ राजकारणात असं उमदं मन लागतं.
क्

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*