कमी वयातच मोठी जबाबदारी पेलणारे विराट मनाचे विराज नाईक (दादा)...…...
*विराजदादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*!
*(एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व – मनोजकुमार मस्के, पत्रकार दै. पुण्यनगरी)*
शिराळा तालुक्यात आज जर कोणाकडे युवा नेतृत्व म्हणून पाहिलं जात असेल, तर तो चेहरा म्हणजे विराजदादा नाईक. शांत, संयमी आणि अभ्यासू हे त्यांचं व्यक्तिमत्त्व जसं सौम्य आहे, तसंच त्यांचं कार्य मात्र ठाम, प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. कमी वयातच उद्योगाची जबाबदारी स्वीकारून त्या जबाबदारीचं सोने करणं हीच त्यांच्या कर्तृत्वाची ओळख आहे.
*यशाचा प्रवास : शिक्षण ते उद्योगजगतातील यश*
विराजदादांनी आपलं तांत्रिक शिक्षण पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मधून पूर्ण केलं. त्यानंतर लंडनच्या नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटी येथून एम.बी.ए. इन बिझनेस मॅनेजमेंट ही पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण करताच, वडील मानसिंगराव नाईक यांनी त्यांच्यावर ‘विराज इंडस्ट्री’ची जबाबदारी दिली आणि विराजदादांनीही ही जबाबदारी विश्वासाने पेलत, उद्योगजगतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
*उद्योगाची जबाबदारी – आणि सामाजिक जाण*
विराज इंडस्ट्री आज फक्त एक उत्पादन करणारी कंपनी नाही, तर ती शिराळा तालुक्यातील शेकडो कुटुंबांचा आधार आहे. विराज पशुखाद्य, विराज सॅनिटायझर यांसारखी अनेक उत्पादने बाजारात मोठ्या प्रमाणावर पोहोचली. देशी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणं हे साधं काम नाही, पण हे अवघड कामही विराजदादांनी केवळ कौशल्याने नव्हे, तर दूरदृष्टीने साध्य केलं.
शिराळा तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आज अनेक महिला आणि तरुण रोजगारासाठी विराज इंडस्ट्रीत काम करत आहेत. त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह या उद्योगामुळे होतो, हेच विराजदादांच्या कार्याचं मोठं यश आहे.
*एक व्यक्ती – अनेक पैलू*
विराजदादांचा स्वभाव जितका प्रेमळ आहे, तितकाच तो माणूस जोडणारा आहे. कोणताही कार्यकर्ता असो, छोटा असो वा मोठा – दादा प्रत्येकाशी आपुलकीने बोलतात. कर्मचाऱ्यांची अडचण समजून घेतात, चांगल्या कामाचं कौतुक करतात. त्यामुळेच आज विराज नाईक हे नाव फक्त एक उद्योजक म्हणून नव्हे, तर एक लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखलं जातं.
*राजकारणापासून दूर, पण जनतेच्या मनात घर*
दादांना आजवर कोणत्याही राजकीय पदाची अपेक्षा नव्हती. त्यांनी नेहमी "लोकांच्या राहून, लोकांसाठी" काम केलं. त्यामुळेच शिक्षण संपवून तालुक्यात आल्यावर एकही मित्र नसलेले विराजदादा, आज मात्र मित्रांचा लोंढा घेऊन फिरत आहेत.
त्यांच्या गोड बोलण्याने, विशाल मनाने आणि सत्यनिष्ठ विचारांमुळे आज तालुक्यातील तरुण त्यांना "आदर्श" म्हणून पाहतात.
---
🌹 *विराजदादा नाईक यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा*!
*तुमचं यश असंच सतत वृद्धिंगत होवो, आणि शिराळा तालुक्याचं नाव तुम्ही देशविदेशात उजळवत राहा, हीच प्रार्थना*.
Comments
Post a Comment