*वाढदिवस एका दोस्तीतल्या पत्रकाराचा*
*वाढदिवस एका दोस्तीतल्या पत्रकाराचा* दोस्तीतील राजा माणूस मांगले गावचे सामान्य गरीब कुटुंबातील धडाकेबाज निस्वार्थी पत्रकार आणि सगळ्यांचे लाडके मा. विजय गराडे आज मांगले परिसरातील व शिराळा भागात सच्या मित्र, कणखर पत्रकार म्हणून विजय गराडे यांची ओळख आहे. अनेकांचे वाढदिवस साजरे करणारा अनेकांच्या वाढदिवसानिमित्त लिहिणारा हा पत्रकार आज त्याचा वाढदिवस त्यानिमित्ताने आमचे तोडकेमोडके दोन शब्द. या मानसाच्या मनाला कुठेही चोरकप्पा नाही. जे असेल ते तोंडावर आणि स्पष्ट बोलणारा हा माणूस माणूस म्हणून सर्वांना भावतो हे मात्र तितकंच खरं आहे. जवळपास हजारो मित्र मित्रपरिवार त्यांनी या संपूर्ण भागात तयार केला. दोस्ती करावी तर ती विजय गराडे यांनीच. मिटींगला आल्यानंतर शेवटी बसणारा, चुकीचे दिसताच उठून सांगणारा आणि नेहमी हसत मुख असणारे विजय गराडे. रात्री अपरात्री कोणाचाही फोन वाजू दे विजयची मदत तत्पर असते.कोरोना काळात घरात न बसता प्रशासणाला पोलीस आरोग्य विभागाला अहोरात्र मदत केली मराठी पत्रकार संघाचे ते माजी अध्यक्ष होत...