*किरण तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा*
*किरण तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा*
ज्यांच्याजवळ आयुष्यातील सगळी गुपित उघडी करावीत,समोर कितीही दुःखाचे डोंगर असले तरी ज्यांच्याशी बोलल्यावर त्या अवघड डोंगराची चढण सोपी व्हावी, दाट धुक्यात वाट हरवल्यावर क्षणातच कुणीतरी बोट धरून मी आहे रे सोबत...! असं हक्काने म्हणावं; अगदी असचं आजचं व्यक्तिमत्त्व आहे. आमचे लहान बंधु वेनलेस कंपनिचे (ऐरीया मॅनेजर) किरण मस्के त्यांचा आज वाढदिवस त्या निमित्ताने..
आम्ही तिघे सख्खे भाऊ मी मोठा मनोज ,मधला अमर , आणि आमचा सर्वात लहान भाऊ किरण. खरं पहाता भरत, राम, लक्ष्मण यांच्या सारख झालेलं हे एक सुंदर नातं आहे. आमच्या वडीलांचे 12/5/2009 रोजी निधन झाले. त्यानंतर आम्ही कधीही ऐकामेकापासुन वेगळे न राहण्याचा निर्णय घेतला. आज या नात्याला एक तपाहुन अधिक काळ लोटलाय. आज किरणचा आमच्या लहान भावाचा वाढदिवस आज हा वाढदिवस साजरा होत असताना मनाला खुप आनंद होत आहे. अनेक खडतर प्रवास केल्यानंतर या सुखाचा अनुभव घेता येतोय. लहानपणी वाढदिवस म्हणजे काय माहीत नसल्यामुळे कधी साजरा करण्याचा योगच आला नाही. पण आयुष्यात स्वतःच्या पायावर ऊभा राहुन कुटंबा सोबत वाढदिवस साजरा करणे हा एक वेगळा आनंद आसतो. मला माझ्या दोन्ही भावांचा अभिमान वाटतो. कारण अमर हा बिएसएफ मध्ये देशाची सेवा करतोय तर किरण हा मेडीकल च्या माध्यमातुन अनेक रूग्णांची सेवा करतोय. आणी या दोघांच्या पुण्याईने आमचे कुटुंब एकत्रीत आणी आनंदीत असते. नोकरीला राहील्यापासुन किरण यांनी अत्यंत प्रामाणीकपणे पडेल ती जबाबदारी स्विकारली . आज त्यांना त्यांच्या प्रामाणीकपणाचे श्रेय मिळाले. मेडीकल मध्ये बारकुट लावणे ते ऐरीया मॅनेजर पर्यंतचा खुप खडतर असा प्रवास होता. प्रामाणीक काम केल्यावर माणुस खरच मोठा होतो हे किरण यांनी दाखऊन दिले. आज किरणच्या वाढदिवसा निमीत्त त्यांचा एक घडलेला किस्सा सांगतो. एक दिवस किरण मेडीकलमध्ये आसताना एक कस्टमर आले. त्या कस्टमरची मुलगी शेवटच्या घटका मोजत होती. डाॅक्टरांनी त्या मुलीच्या वडीलांना काही महागडी औषधे लिहुन दिली. मुलीचे वडील मेडीकलमध्ये गेले पण औषधाचे बिल दहा ते बारा हजार दरम्यान झाले. त्या गरीब माणसाकडे पैसे न्हवते. त्या माणसाने किरण सरांना सर्व हकिकत सांगीतली. एका क्षणाचाही विचार न करता किरण सरांनी त्यांना औषधे दिली. कोण कुठला अनोळखी माणुस फक्त त्याच्या सागण्यावर विश्वास ठेवला. ती औषधे घेउन तो माणुस निघुन गेला. त्यानंतर आठ-दहा दिवसात एक बारा- तेरा वर्षाची मुलगी मेडीकलमध्ये आली आणी तीने एक कागद आणी बारा हजार रूपये किरण सरांच्याकडे दिले . किरण सरांनी तो कागद उघडुन पाहीला तर आतमध्ये लिहले होते. *काका जर तुम्ही माझ्या वडीलांच्यावर विश्वास ठेउन औषधे दिली नसती तर कदाचीत मी आज जीवंत नसते*. आज मी तुमच्यामुळे हे जग पाहु शकले. हे वाचुन किरणसर खलीच बसले व त्या मुलीला जवळ घेउन खुप रडले. आज सुद्धा त्या मुलीने दिलेला कागद किरणसरांनी जपुन ठेवला आहे. असे अनेक किस्से किरण सरांच्या आयुष्यात आले . त्यांच्या प्रामाणिक स्वभावामुळे अनेक हुशार पेशंटनी उधाऱ्या बुडवल्या . त्या त्यांनी स्वतःच्या खिशातून भरून काढल्या . प्रामाणिकपणाचा वारसा त्यांना त्यांच्या वडीलांकडून मिळालाय. किरण आज आपण प्रामाणीक पणे काम केल्याने तुम्हाला बॅक बॅलेन्स जरी नाही साठवता आला तरी माणसांची मनं व नाती जपून ठेवण्यात तुमचे पासबुक मात्र भरलेले पाहुन खुप आनंद झाला. आज मला अणि अमरला अभिमान वाटतो तु आमचा बंधु असल्याचा. आज तुझ्या वाढदिवसानिमीत्त आपल्या कुटुंबाकडुन हार्दिक शुभेच्छा ! आईचा आशिर्वाद,
हा नंबर किरणचा आहे. -: 9167393988 , 9029978825
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा किरण दादा.... खूप खूप जग व खूप मोठा हो....
ReplyDeleteवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ReplyDeleteGreat bhau khup chan
ReplyDelete