हे आहेत औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर- आयएएस. औरंगाबादेत भाजी बाजारात खरेदी करतांना.

डाँ.विश्वभंर चौधरी यांच्या फेसबुक वाँलवरून साभार!!!

हे फोटो बघा. खादी आणि खाकी यांच्या खूप पुढे जाणारं हे चारित्र्य आहे. समाजाचे खरे हिरो! 

हे आहेत औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर- आयएएस. औरंगाबादेत भाजी बाजारात खरेदी करतांना.  

आपल्या कर्तृत्वानं 'खास' बनल्यानंतरही 'आम' राहण्यात खरी कसोटी लागते माणसांची. कोणतंही ढोंग न करता साधेपणा कसा टिकवला जाऊ शकतो याचं हे फोटो उदाहरण आहेत. 

माझ्या पाहण्यात हे फोटो आले तेव्हा राहवलं नाही. फोनवरून त्यांची परवानगी घेतली. पुढच्या पिढीत हा साधेपणाचा आणि सच्चेपणाचा आदर्श झिरपावा म्हणून हा उद्योग. त्यांनी परवानगी दिली, हे सांगत की यात विशेष काही नाही, हे माझं रूटीन आहे.  

महाराष्ट्र नशीबवान आहे. प्रशासनात आजही असे अनेक अधिकारी आहेत ज्यांचं माणूसपण सुटलेलं नाही. जे तरूण मित्र एमपीएससी, आयएएस होण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी हे फोटो कायम स्मरणात ठेवावेत म्हणून पोस्ट करत आहे.

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....