मंगला भावे यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
जेष्ठ लेखिका व प्रज्ञा साप्ताहीकाच्या उपसंपादीका मंगला भावे यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्या ७७ वर्षांच्या होत्या. जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती मधुकर भावे, मुलगी मृदुला व नातु तनिष्क असा परिवार आहे. मंगला भावे यांचे आक्रोश व ईतर दोन पुस्तीका प्रकाशित झाल्या होत्या. गेली ४वर्ष त्या मधुमेह व किडणी विकाराणे आजारी होत्या. तब्बेत बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात त्या रुग्णालयातुन घरी परतल्या होत्या. मात्र रविवारी दुपारी त्यांना हृदयाचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. रविवारी दुपारी वागळे इस्टेट येथे स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Comments
Post a Comment