सांगली जिल्हा बॅंकेचे व्यवस्थापक मा. मानसिंगराव पाटील साहेब वाढदिवस विशेष

शिराळा तालुक्यातील एक छोटेसे गाव मांगरूळ याच गावातील त्या काळातील प्रसिद्ध दुकानदार भिमराव मस्के-पाटील (तात्या) यांचे सुपुत्र *सांगली जिल्हा बॅंकेचे व्यवस्थापक मा. मानसिंगराव पाटील साहेब*. घरची परिस्थिती फारशी बरी नसताना वडीलांनी किराणा दुकानाच्या जिवावर तिनं मुलांचे शिक्षण पूर्ण केले.मानसिंग पाटील साहेब गावच्याच जि.प. शाळेत शिकले.  पुढील शिक्षण त्यांनी बिळाशी येथील वारणा प्रसाद विद्यालयात घेतले. मानसिंगराव पाटील हे पहिल्यापासूनच हुशार होते. प्रत्येकाशी मैत्री करणे त्यांना आवडते. *अनेक गरजवंतांना त्यांनी नेहमीच मदत केली आहे. सहज हाक दिली तर शे-पाचशे लोकांचा मित्रपरिवार जमा होतो एवढी ताकत त्यांच्या वाणीत आहे*.  मी अनेकवेळा मानसिंग पाटील यांना भेटलो आहे.  भेटावयास आलेल्या माणसाची विचारपूस करणे त्याचा मान सन्मान करणे हे जणू मानसिंग पाटील यांच्या रक्तातच आहे. प्रत्येकाशी आपुलकीने वागणं हा त्यांचा गुणधर्म आहे. अनेक राजकीय पुढारी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जिल्हा बॅंकेचे व्यवस्थापक झाल्यानंतर त्यांचा सत्कार संपूर्ण गावाने घेतला. हा मानसिंग पाटील यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा पुरस्कार होता. बॅंकेचे काम करत असताना आपल्या बॅंकेला जास्तीतजास्त नफा होईल याच उद्देशाने त्यांनी कार्य केले. 
        *मानसिंग पाटील आपले कार्य करत असताना त्यांनी आपल्या आई-वडिलांना कधीही दुरावा दिला नाही*. किंबहुना नेहमीच त्यांची विचारपूस करून त्यांना लागेल ती गोष्ट त्यांनी पुरवली आहे. आज वडील हयात नाहीत परंतु आपल्या आईला दैवत माणून कार्य करणारा आणि सर्व मित्र परिवार भाऊबंदकी जपणारा हा एकमेव अधिकारी असेल. अशा या अधिकारातील प्रेमळ माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

धन्यवाद!
*मनोज मस्के*



        

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....