*कुस्ती वर अफाट प्रेम करणारा अवलिया 'प्रितिराज ऑफसेट चे सर्वेसर्वा मा प्रताप भाऊ कदम'.......*

*कुस्ती वर अफाट प्रेम करणारा अवलिया 'प्रितिराज ऑफसेट चे सर्वेसर्वा मा प्रताप भाऊ कदम'.......* 
..................... 
✍️ *लेखन पै अशोक सावंत -पाटील* सोंडोलीकर
................................ 
नागपंचमी चे शिराळा तालुक्यातील प्रताप कदम हे असं वेगळे व्यक्तिमत्त्व आहे की *कुस्ती  सारख्या रांगड्या खेळाला विशेष महत्त्व देणारे  कुस्ती प्रेमी, कुस्ती प्रसारक म्हणजे प्रताप भाऊ कदम*...... 
      आपला अमुल्य वेळ खर्चून ते सतत कुस्ती ला नवसंजीवनी देत असतात. आजच्या या धावपळीच्या युगात ते स्वतः दिवस रात्र कुस्ती वाढीसाठी प्रयत्न करत असतात. कोणत्याही गावच्या कुस्ती मैदान आयोजकांनी फक्त फोन केला तरी ते कुस्ती मैदान साठी उपस्थित असतात. *३२ शिराळा येथे त्यांच्या स्वमालकीचे प्रितिराज ऑफसेट नावाचे नामांकित प्रेस आहे*. आणि याच माध्यमातून अनेक गावाचे कुस्त्यांचे जाहिरात, बॅनर बनवुन देण्याचे काम अल्प दरात ते आजपर्यंत करत आले आहेत. आणि दुसरे विशेष म्हणजे ते स्वतः च्या स्वखर्चाने प्रितिराज ऑफसेट च्या  नावाने वरील *मोठ्या कुस्तीतील विजेत्या पैलवानांना कायम शिल्ड देऊन ते त्यांचा गौरव करत असतात*, आणि याच्यातुनच नवोदित पैलवानांना स्फुर्ती मिळत असते. 
     *गेल्या १० जानेवारी रोजी कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य आयोजित कुस्ती मैदान वर त्यांनी स्वत: मैदान ची जाहिरात, वरील सर्व कायम शिल्ड  देऊन एक मोठी मदत कुस्ती हेच जीवन ला केली*,त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहे. 
 कुस्ती क्षेत्राव्यतिरीक्त प्रताप कदम यांची राजकीय क्षेत्रात मोठी छाप आहे. *विद्यमान आमदार मा. मानसिग नाईक (भाऊ )  यांचे ते अगदी जवळचे सहकारी आहेत*. तालुक्यात राष्ट्रावादी पक्ष वाढीसाठी त्यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांबरोबर त्यांचे अगदी सलोख्याचे संबंध आहेत. 
 महाराष्ट्रातील टॉपच्या पैलवानांच्या बरोबर सुद्धा त्यांच्या ओळखी आहेत. प्रसिद्धी पासून चार हात लांब असणारे प्रताप कदम हे कधीही आपल्या अविर्भावात नसतात . 
प्रत्येक गावात मैदान व्हावीत म्हणून त्यांचा सतत प्रयत्न असतो . 
असे हे सहृदयी व्यक्तिमत्त्व प्रताप भाऊ कदम यांच्या बद्दल लिहिण्यासारखे भरपुर काही आहे पण इतकंच............. 
•••••••••••••••••••••••••
धन्यवाद
*पै अशोक सावंत/ पाटील* कुस्ती संघटक
*कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य*
अध्यक्ष शाहुवाडी तालुका

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*