डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील यांची 28 जुलै 2020 रोजी सिल्व्हर ओक वर मा.शरदचंद्रजी पवार यांच्याशी भेट
डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील यांची 28 जुलै 2020 रोजी सिल्व्हर ओक वर मा.शरदचंद्रजी पवार यांच्याशी भेट •••••••••••••••••••••••••••••••• डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील राज्यपाल नियुक्त थेट (खेळाडू आमदार) साठी इच्छुक. •••••••••••••••••••••••••••••• राजकारणात कुस्ती आणि कुस्तीत राजकारण या गोष्टी अपल्यासाठी नव्या नाहीत.नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कुस्तीतली वाक्ये खूपच गाजली.मात्र,खऱ्याखुऱ्या कुस्तीतला हिरो असणारा एक चेहरा आता राज्यपाल नियुक्त थेट (खेळाडू आमदार) साठी इच्छुक असल्याची माहिती मिळते आहे. सांगली जिल्ह्या व खानापूर तालुक्यातील भाळवणी गावचे सुपूत्र,डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील हे खेळाडू आमदारकी साठी इच्छुक आहेत.दिनांक 28 जुलै 2020 रोजी त्यांनी यासंदर्भात राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा मा.श्री.शरदचंद्रजी पवार यांची सिल्व्हर ओक बंगल्यावर भेट घेतली.सदर भेट ही अर्थातच येणाऱ्या राज्यपाल नियुक्त थेट आमदारकीच्या खेळाडू आमदार पदाबाबत असल्याची माहिती मिळते. कुस्ती क्षेत्रात हिंदकेसरी मारुती माने यांना मा.श्री.राजीवजी गांधी यांच्या कालखंडात थेट खासदार ह...