पांडुरंगा उघड की रे दारआता उशीर फार झाला
पांडुरंगा उघड की रे दार
आता उशीर फार झाला
ये रे धाऊन हाकेला
तुझा भक्त आधीर झाला
कोंडून घेतलंस स्वतःला
चार भिंतींच्या आड
पोरके झाले भक्त
का लावलंस तुझ याड
अरे किती दिवस झाले तुझा
अभिषेक नाही केला
पांडुरंगा उघड की रे दार
आता उशीर फार झाला
सुकले की रे कंठ तुझी
भजने ही न गाता
जाईल प्राण देहातून
आम्हा टेकुदे रे माथा
अरे किती दिवस झाले
तुला भोग नाही दिला
पांडुरंगा उघड की रे दार
आता उशीर फार झाला
दर्शनाच्या ओढीनं वाहतेय
चंद्रभागा
पाहवेना तिलाही मंदिरातली
सूनी सुनी जागा
आषाढीच्या वारीचा
सोहळा जवळ आला
पांडुरंगा उघड की रे दार
आता उशीर फार झाला
अनिल सपकाळ
८८७९१३८६८६
Comments
Post a Comment