अनेक योगासनांची निर्मीती करूण योगामधील जागतिक करंडक भारतात खेचुन आणणारे योगुरू प्रा. अविनाश धस

  अनेक योगासनांची निर्मीती करूण योगामधील जागतिक करंडक भारतात खेचुन आणणारे योगुरू प्रा.  अविनाश धस 
माणसाचं मस्तक पुस्तकाणे बदलतं आणि न होनारं धाडस आपोआपच आंगात येतं. ही कहाणी आहे सांगली जिल्हा शिराळा तालुक्यातील बिळाशि गावचे सुपुत्र योग गुरू पै. अविनाश गणपतराव धस यांची . 
      सन 1993 ,साली 74 किलो वजनी गटात मराठवाडा केसरी स्पर्धा प्रथम पारितोषीक मिळाले.   कुस्तीच भयंकर वेड, व्यायामाची आवड,  वारणा नदीत प्रवाहाच्या विरूद्ध  पोहण्याचा मनसोक्त छंद, त्याच बरोबर स्वामी विवेकानंद यांचे तेजस्वी विचार आणि देशभकती यांचा लहानपणीच पडलेला प्रभाव. अविनाश धस यांचे शिक्षण बिळाशि ,ता.शिराळा येथील वारणाप्रसाद विद्यालयात झाले.  स्वामी विवेकानंद यांचेवरील निस्सीम श्रद्धेने स्वामीजींनी   स्थापन केलेल्या रामकृष्ण मठ- मिशन मध्ये जायचे निश्चित केले
        मला देशासाठी काहीतरी करायचे आहे या विचारांनी त्यांच्या डोक्यात थैमान घातले होते . त्याच दरम्यान त्यांनी बी.ए.एम.पी.एड. पुर्ण केले. नंतर ते सोलापुरला दिलीप महाविद्यालयात शारीरिक शिक्षक म्हणून रूजू झाले. दरम्यानच्या काळात त्यांनी रामकृष्ण मठ मिशन साठी जीवन व्हायचे ठरविले.  अविनाश धस हे नोकरी ,आणि घरदार सोडून थेट पुण्यातील रामकृष्ण मठात दाखल झाले त्यांनी सहा वर्ष पुण्यात  तर कोलकत्याच्या बेलुर मठात दोन वर्ष सेवक म्हणुन काम केले. 
          पुण्याच्या मठात असताना  पानमळा, दांडेकर पूल झोपडपट्टी परिसरातील भटकनारया मुलांना धस यांनी योगाकडे वळवले .चांगल्या  शाळेत व महविदयालयात शिक्षणाची सोय केली  व चांगला  पौष्टीक आहार दिला.ज्यांना योगातील 'य' सुद्धा माहीत नव्हता झिरो होते त्यांना  योग शिकवून हिरो बनविले त्यांनी योगालाच पुर्णपणे जवळ करण्याचे ठरविले. त्यानंतर स्वतंत्रपणे योगाभ्यासाचे धडे देण्यास सुरवात केली. राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राला पहिले सुवर्ण पदक मिळवून देण्याचे काम त्यांनीच घडविलेल्या  झोपडपटटीतील योगपटटूने केले  सरांनी मुलांना विश्वास दिला आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला गरिब होतकरू, झोपडीत राहणारी मुले. कृष्णा पालखे, सागर नलावडे, कमलेश झा, निखील दिक्षीत, सुनिल शिवतारे, कृष्णा काळे ही सर्व गरिब मुले धस यांच्या हाताखाली शिकुन जागतीक स्पर्धेत त्यांनी योगाची चमक दाखवली. 
        जागतिक योग करंडक स्पर्धेत याच गरिब मुलांनी इतिहासच घडवला. योगाची सुरूवात भारतात झाली असताना हा करंडक भारताऐवजी सिंगापुरला जाणार की काय अशी परिस्थीती निर्माण होती. परंतु या गरिब मुलांनी जागतीक स्पर्धा जिंकुन तो करंडक  भारतात आणला. आणि योगाची जन्मभुमी भारतच आहे हे साऱ्या जगाला दाखवून दिले. यामागे अविनाश सरांचे खुप मोठे कष्ट होते हे विसरून चालणार नाही.लहानपणीच आईवडीलांचे छत्र हरविलेलया सागर नलावडे  सतत आजारी मुलाला योग आणि पौष्टिक आहार देऊन योग प्रवीण केले अर्जेटिना येथे जागतिक योग स्पर्धेसाठी पाठविले आणि भारतासाठी सुवर्ण पदके प्राप्त केली, सरांनी शिकवलेली सागरची आसने पाहून सर्वच अचंबित झाले मेक्सिको या देशाने सागरला दत्तक देण्याची विनंती केली, सागर में राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले, अश्रफ पठाण या एस टी ने प्रवास करायची चणचण असणारया मुलाला थायलंड येथे स्पर्धेसाठी पाठवून ३ सुवर्ण पदके मिळवली , सरांनी प्रवीण केलेल्या कित्येक मुलां -मुलींना जिल्हा, राज्य, व  राष्ट्रीय स्तरावर पदके मिळाली, हजारो मुलांना योग, प्राणायाम, ध्यान शिकवले, नितीन सुरते या मुलाला  डोक्यावर पाय घेऊन वृश्चिकासनात हातावर चालायला शिकवले, चालत्या मोटार सायकल वर योग, बांबूच्या शिडयावर योग असे योगातून विविध  साहसी प्रकार केले "झी"टिव्ही वरील मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमात  "महाविजेपद" मिळवून महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार नेला. 
        आजपर्यंतच्या सखोल अभ्यासातून त्यांनी  शेकडो योगासने व शेकडो योग मनोऱ्याची निर्मिती केली आहे. पृष्ठकंदासन, विपरीत कंदासन, पक्षासन युक्त शिरासन ,विपरित पदमासन यासारख्या आसनाचा त्यात सामावेश आहे. यातील बरिचशी आसने अवघड आहेत.
      योगामुळे माणसाची शारिरिक, माणसिक कार्यक्षमता वाढते. परदेशातील लोकांनाही त्याचे महत्व पटले आहे. मात्र आपल्या देशात तितकीशि जागृती दिसत नाही असे योगगुरू प्रा. अविनाश धस यांनी सांगितले.  तसेच आसन  प्राणायाम,धयान ,प्रसार अधिकाधिक  व्हावा यासाठी.या आसनांचा प्रयोग शाळाशाळांत घेण्याचा विचार आहे. 
         योगा हा  अनेक खेळातील कौशल्य वाढविण्यासाठी  अनेक व्याधिंना दुर करायची ताकद योगामध्ये आहे. शरीरातील ताठरता घालवून दुखापती दूर करण्यासाठी , लवचिकतेसाठी, मुलांचया एकाग्रतेसाठी व आरोग्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. अनेक मल्लाकडुन प्रशिक्षणाची मागणी होत आहे. तसेच अष्टांग योगाचा समावेश शालेय  अभ्यासक्रमात  कृतीशील व्हावा   अशी अपेक्षा धस यांनी व्यक्त केली.

मनोजकुमार मस्के : शिराळा

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....