आजच रात्री १२ वाजता प्रज्वलीत झालेले ‘महाराष्ट्र राज्य’ नेमके कुठे आहे?
आजच रात्री १२ वाजता प्रज्वलीत झालेले ‘महाराष्ट्र राज्य’ नेमके कुठे आहे? - मधुकर भावे आज रात्री १२ वाजता महाराष्ट्र राज्याला ६४ वर्षे पूर्ण होतील. ६५ व्या वर्षात महाराष्ट्र पाऊल ठेवेल. बरोबर ६४ वर्षांपूर्वी आजच्याच रात्री १२ वाजता देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा नकाशा विद्युत डदीपांनी राजभवनवर प्रज्वलीत केला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे पंडितजींच्या शेजारी होते. महाराष्ट्रचे महनीय राज्यपाल श्री. श्रीप्रकाश हे ही यावेळी होते. यापूर्वी त्याच दिवशी सायंकाळी शिवाजी पार्क येथे प्रचंड सभेत संयुक्त महाराष्ट्राच्या िनर्मितीची घोषणा झालीच होती. पाच वर्षांच्या अथक लढाईनंतर मराठी भाषिकांना ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र’ या घोषणेप्रमाणे मराठी भाषिकांचे राज्य मिळाले. ते सुखासुखी मिळाले नाही. इतर राज्यांना जसे भाषिक तत्त्वाने सहजपणे मिळाले तसे महाराष्ट्राला मिळाले नाही. खूप मोठा लढा झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा या देशातील लोकशाहीच्या मार्गाने लढवलेला, तो सगळ्यात मोठा लढा म्हणून नोंदवला गेला. जात-धर्म-पंथ-पक्ष.... व...