अंत्री बुद्रुक येथे रंगणार अंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान*
*अंत्री बुद्रुक येथे रंगणार अंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान*
======================================
*मनोजकुमार मस्के- मंगरूळ* *9890291065*
======================================
श्रीमंत खूप जण असतात. पण, दानतवृत्ती फार कमी लोकांकडे असते. त्यात डॉ. पी. डी. पाटील साहेब आहेत. उत्तम आणि दर्जेदार शिक्षण हे मूल्य त्यांनी आजवर सांभाळले. त्यांच्या कार्याची नोंद इतिहासात केली गेली.’’ आज अंत्री बुद्रुक येथील कुस्ती मैदानासाठी लाखो रुपये खर्चून भारतातील नामांकित पैलवान आणून वयोवृद्ध, गोरगरीब जनतेला देशविदेशातील पैलवान पाहता यावे या हेतूने फार मोठा प्रयत्न डॉं. पी डी पाटील साहेबांच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या नवीन वर्षानिमित्त गावच्या यात्रेचे औचित्य साधून छोट्याशा लोकवस्तीत अंत्री बुद्रुक येथे होताना दिसत आहे.
ऐंशीच्या दशकात वसंत दादा पाटील यांनी कुस्ती वाचावी व ती पुढे जावी यासाठी प्रत्येक सहकारी संस्थांना जणू आदेश दिला होता. किमान दहा पैलवान प्रत्येक साखर कारखाना, दूध संघ इतर सहकार क्षेत्रातील सर्व कंपन्या व संस्था यांनी सांभाळणे बंधनकारक होते. राजे महाराजांच्या नंतर राजाश्रय संपला. वसंत दादांच्या नंतर पैलवानांच्या बाजूने बोलणारा नेता संपला. परंतु डॉ. पी डी पाटील साहेबांच्या माध्यमातून मात्र लोकाश्रय जागा असल्याची जाणीव होताना दिसत आहे. वसंतदादा पाटील यांनी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी विनाअनुदानित शिक्षणसंस्थांना मान्यता देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. ही दूरदृष्टी डॉ. पी. डी. पाटील यांना समजली आणि शिक्षणसंस्थेचे बीज लावले. शिक्षणाचा गुणात्मक विकास करण्याचा ध्यास घेतला. त्याचबरोबर महाराष्ट्रातील कुस्ती सुद्धा वाचली पाहिजे हा ही मनसोबा मनाशी घट्ट बांधला. आणि आपल्या अंत्री बुद्रुक गावात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान घेतले. हरियाणा, दिल्ली, ईतर देशातून पैलवानांची फौज अंत्री बुद्रुक येथे दाखल होऊ लागली. माजी सरपंच सध्याचे उपसरपंच राजेश चव्हाण (आप्पा) व यात्रा कमिटीचे अध्यक्ष आणि युवकांचे अशास्थान प्रतापसिंह चव्हाण (अण्णा) व अंत्री बुद्रुक गावातील ग्रामस्थ या सर्वांच्या सोबतीने डॉ. पी.डी. पाटील यांनी हे मैदान आयोजित केले आहे. *एक नंबरची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड विरुद्ध अमीर मोहम्मदी सीनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप इराण* यांच्यात होणार असून नंबर दोन ची कुस्ती *जॉर्जिया वर्ल्ड चॅम्पियनशिप टॅटो विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर* यांच्यात होणार आहे. *नंबर तीन साठी संदीप मोठी विरुद्ध सुदर्शन खोतकर* नंबर चार साठी *अमर पाटील विरुद्ध कुमार पाटील* त्याचबरोबर अनेक दर्जेदार लढती होणार आहेत. अंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान शिराळा, वाळवा, शाहुवाडी व संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांना पाहता येणार आहेत. मंगळवार दि. 9 एप्रिल 2024 रोजी दुपारी २ वाजता अंत्री बुद्रुक येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान पार पडणार असून कुस्ती मैदानाचे आयोजक यात्रा कमिटी अंत्री बुद्रुक व मानकरवाडी यांचे असणार आहे. या मैदानासाठी तमाम महाराष्ट्रातील व परिसरातील कुस्ती शौकीन मोठ्या प्रमाणात हजेरी लावतील अशी आशा संयोजक व आयोजक यांनी बोलून दाखवली
Comments
Post a Comment