*एकाच रात्रीत 23 घरफोड्या करणाऱ्या टोळीतील तिघेजन कोकरूड पोलिसांच्या हाती* ...
*एकाच रात्रीत 23 घरफोड्या करणाऱ्या टोळीतील तिघेजन कोकरूड पोलिसांच्या हाती* ... बिळाशी ता.शिराळा येथील चौदा, मांगरुळ पाच, बेलेवाडी एक, अस्वलेवाडी एक, रिळे दोन असे एकूण तेवीस बंद असलेली घरे, एका रात्रीत चोरट्यांनी फोडून सुमारे एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. सातारा पोलिसांनी परिसरातील घरफोडी मधील संशयित आरोपी सुरदेव सिलोन नानावत, परदुम सिलोन नानावत रा. घोटवडे ता. मुळशी, राम धारा बिरावत रा. करमोळी ता. मुळशी, जिल्हा. पुणे या तीन आरोपींना अटक केली होती. त्यांचा ताबा कोकरूड पोलीसांनी घेवून न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील भुईंज, मेढा, वाई, वाटार स्टेशन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावीस घरफोड्या झाल्या होत्या. या चोरीतील तीन संशयित आरोपींना सातारा एल. सी. बी. च्या टीमने अटक केली होती. त्यांचा ताबा कोकरूड पोलिसांनी घेतला असून आरोपींना शिराळा न्यायालयात हजर केले असता, त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चोरट्यांनी एका रात्रीत ब...