पांडुरंग खांडेकर (अण्णा) द्वितीय पुण्यस्मरण निमीत्त
*मांगरूळ गावातील, प्रतिष्ठीत व जेष्ठ नागरिक , पांडुरंग साधू खांडेकर (साहेब) यांना द्वितीय पुण्यस्मरण निमित्त भावपूर्ण आदरांजली.. अण्णा गावातील सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेऊन काम करायचे, अनेक जण त्यांना (आण्णा) म्हणत, 1970 साली ते तालुक्यातील पहिले इंजिनियर असल्यामुळे काही लोक त्यांना (साहेब) ही म्हणत*..
*अण्णांनी रिटायर झाल्यानंतर आपल्या मूळ गावी मांगरूळ येथे राहायचा निर्णय घेतला. छान असं घर बांधलं, आणि अनेकांना मदत करत गावात चांगलं काम कसं होईल या दृष्टीने ते कार्य करत होते. आण्णांनी गावातील ज्येष्ठ मंडळींना एकत्र घेऊन ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली. ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून अनेक वृद्धांना फायदा कशाप्रकारे देता येईल, या दृष्टीने त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले. अनेक वृद्धांना त्यांनी एसटीचे अर्धे तिकीटपास मिळवून दिले. त्याचबरोबर वृद्धांना असणाऱ्या अनेक सुविधाही त्यांनी मिळवून दिल्या*.
*आण्णा तसे राजकारणी कमी सामाजिक क्षेत्रात त्यांची जास्त धडपड असे. महाराष्ट्र शासनाने चालु केलेली योजना गाव तंटामुक्तीचे ते अध्यक्ष होते. अण्णांचं काम तंटामुक्त समितीच्या माध्यमातून खूपच जोरात चालू होते. अनेक तंटे त्यांनी गावातच मीटविले किंबहुना तंटामुक्त कमिटीला त्यांनी पहिल्या नंबरचं ३ लाख रूपयेचं बक्षीसही मिळवून दिलेलं होतं. आण्णा तसे गगनगिरी महाराजांचे भक्त ते नेहमी खोपोलीच्या गगनगिरी महाराजांच्या मठात जाऊन सेवा करत असे. त्याचबरोबर आण्णा ब्रह्मकुमारी ओम शांतीचेही ज्ञान लोकांना देत असे. दररोज महादेवाच्या मंदिरात आण्णा ओम शांतीची मुरली वाचत बसलेले असायचे*.
*दोन वर्ष झालं अण्णांना आपल्यातून जाऊन. त्यांनी चालू केलेली सर्वच्या सर्व कामे जशीच्या तशी थांबली. आण्णांनी काढलेला ज्येष्ठ नागरिक संघ बंदच झाला, तंटामुक्त कमिटी ही शांत झाली, आणि आज आण्णाही आपणा सर्वांना सोडून गेले.... याचं कारण आण्णांसारखी प्रामाणिक माणसंच उरली नाहीत. समाजातुन चांगली माणसं जातात तेव्हा त्यांच्याबरोबर चांगलं कामही जाते हे मात्र नक्की. अशा या समाजसेवकास भावपूर्ण आदरांजली
*🌹भावपूर्ण आदरांजली* 🌹🙏
Comments
Post a Comment