शिराळची नागपंचमी नेमकं काय शिकवते...

मनोजकुमार मस्के, मांगरूळ - 98 90 29 10 65

गेल्या अनेक वर्षाची जुनी परंपरा असणारी शिराळा येथील जगप्रसिद्ध नागपंचमीचा सन संपूर्ण शिराळासह पंचक्रोशीत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. परंतु खास करून शिराळा येथे जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा गोरक्षनाथांनी चालू केली. त्यापासून शिराळ्यात जिवंत नागाची पूजा चालू झाली. पूर्वी जिवंत नाग पकडून त्याची घरोघरी पूजा केली जात होती. अलीकडे नाग पकडण्यास बंदी घालण्यात आली त्यामुळे कुठेही जिवंत नाग पाहायला मिळत नाहीत. पूर्वी अनेक प्रकारचे नाग पाहण्यासाठी खास करून शिराळ्यात भारतातून व परदेशातुन  लोकं आवर्जून येत होती. जिवंत नागाची पूजा करणारे ३२शिराळे म्हणून या शिराळ्याची एक वेगळी ओळख संपूर्ण जगभर आहे. अलीकडील काळात नागपंचमीचे शिराळे म्हणून लोकं ओळखू लागली. पूर्वी अनेक प्रकारचे नाग त्याबरोबर अनेक प्रकारची वाद्य पाहायला मिळत होती, ऐकायला मिळत होती. त्याबरोबर नागांची मिरवणूक ही दिवसभर चालत होती. मिरवणुकीत कर्मणुकीचे कार्यक्रम असायचे त्यामुळे अनेक प्रकारच्या सापांच्या बरोबर वेगवेगळी वाद्यही ऐकायला आणि पाहायला मिळायची, विविध मनोरंजन कार्यक्रम पहायला मिळायचे. पण हल्ली तशी नागपंचमी पाहायला मिळत नाही. गल्ली गल्लीत पाच- पाच मंडळे आणि प्रत्येक मंडळाचा एकापेक्षा एक सरऺस असा डॉल्बी, कुणाचं गाणं काय वाजतय नेमकं कळायलाच मार्ग नाही..  नुसता कालवाच कालवा... बघणाऱ्याने नेमकं काय बघावं हेच समजत नाही.... सुप्रसिद्ध असणारी नागपंचमी खरच अशा वातावरणांने जगप्रसिद्ध होईल का? असा  प्रश्न अनेकांना पडला आहे. खरंतर लाखो करोडो रुपये नागपंचमीला खर्च होतात... मग नेमकं यातून काय निष्पन्न होतं. हे बारकाईने पाहण्याची गरज आहे.  यातून नवीन पिढीला काय मिळणार हा संशोधनाचा भाग आहे... अलीकडील काळात तर कुटुंबासोबत नागपंचमी बघायला जाणाऱ्यांची संख्या ही कमी झालेली पाहायला मिळत आहे.. फक्त युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे चित्र फार वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळत आहे. 
    नागपंचमीनिमित्त निघालेल्या  मिरवणुकीत नागाची हल्ली प्रतिमा दिसते खरी. परंतु ती का कशासाठी त्याचं महात्म्य काय, नागपंचमी कोणी चालू केली? यासंदर्भात नवीन पिढी बऱ्याच अंशी अंधारातच असल्याचे पहायला मिळते आहे. शिराळकरांना याबाबत माहिती असेलही परंतु आसपासच्या खेड्यातून येणारे युवा वर्गाला याची माहिती असेलच असे नाही. हा युवा वर्ग नेमकं नागपंचमीला येऊन त्यांनी काय पाहायचं हाही प्रश्न त्याच्या समोर उभा राहतो. खरंतर नागपंचमी जास्तीत जास्त प्रसिद्ध कशी होईल , सापाला देव का म्हटलं जातं.. शिराळकर  इतक्या भक्ती भावाने सापांना का पुजतात... या सर्व गोष्टींचे खऱ्या अर्थाने शिराळ्यात प्रबोधन होऊन लोकांच्या मनात नागपंचमी विषयी आपुलकी निर्माण होणे गरजेचे आहे... नागपंचमी विषयी अनेक पुस्तके प्रसिद्ध होणे गरजेचे आहे... खरंतर अनेक मंडळे एकत्र येऊन नागपंचमी विषयी माहिती सांगणारे एखादे संग्रहालय उभारणे खऱ्या अर्थाने नागपंचमी जिवंत ठेवल्यासारखेच असेल... अशा संग्रहालयात जुन्या नागपंचमीची छायाचित्रे, पुर्वी कशा पद्धतीत नागपंचमी साजरी केली जात होती..., नागपंचमी नेमकी कोणी चालू केली... तिचा संदर्भ काय? नागाला भाव का मानला जातो... सापाचे शेतकऱ्याशी नातं काय? या सर्व गोष्टींची उत्तरे देणारे एखादं म्युझियम शिराळा  येथे होणे गरजेचे आहे. देश विदेशातून या म्युझियमला पर्यटक भेटी देतील ती माहिती जगापर्यंत जाईल त्यावेळी शिराळची नागपंचमी अखंड जिवंत राहील. नुसता एकापेक्षा एक डॉल्बी लावून डॉल्बीच्या ठेक्यावर उड्या मारूनं काही सिद्ध होणार नाही. आपण प्रसिद्ध असणारी नागपंचमी कुठेतरी पाठीमागे घेऊन जातोय याचं भान असणं गरजेचं आहे. खरंतर यावर आत्ताच विचार करणे महत्वाचे आहे. भविष्यात हे असंच चालू राहिलं तर नागपंचमीला आज जगात स्थान आहे ते आपण हिरावून बसेल... खरंतर सर्व युवा पिढीने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे तरच आपण सूर्य, चंद्र, तारे, आहेत तोपर्यंत आपल्या शिराळची नागपंचमी नेहमी जगप्रसिद्ध असेल.. आणि राहील .  संपूर्ण जगभरातून पर्यटक शिराळा येथील नागपंचमी पहायला आवर्जून येतील ... शिराळकर हे सापाचे शत्रू नसून मित्र आहेत एवढा संदेश यातून शिराळची नागपंचमी  देते एवढं मात्र नक्की.


Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*