ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधीदारोदारी फिरतात शासनाचे मार्गदर्शक
ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी दारोदारी फिरतात शासनाचे मार्गदर्शक *मनोजकुमार मस्के* शिराळा पंचायत समिती महिला व बालकल्याण समिती व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण अंतर्गत केटरिंग प्रशिक्षण सध्या मांगरूळ येथील महिलांना देण्यात येत आहे. या प्रशिक्षणांतर्गत ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊन नवनवीन पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवता येतात व त्यातून आपण आपला व्यवसाय कसा करायचा याचं मार्गदर्शन देण्यासाठी. प्रिन्स शिक्षण संस्था येवलेवाडी यांच्या सयुंक्त विद्यमाने केटरिंग प्रशिक्षणनाचे मार्गदर्शन दिले जात आहे. मांगरूळ येथे पाच दिवसाचे महिलांना प्रशिक्षण देण्यात येत असून या प्रशिक्षणा दरम्यान अनेक पदार्थ करून ते कशा पद्धतीने विक्री केली पाहिजे, याचे मार्गदर्शन या शिबिरामध्ये दिले जात आहे. अनेक पदार्थ इथे बनवून त्याला लागणारे प्रमाण कसे असले पाहिजे, त्याला येणारा खर्च किती, आणि त्यातून मिळणारं उत्पन्न या ही गोष्टी संपूर्ण समजेल अशा भाषेत या शिबिरात सांगितल्या जात आहेत. हे प्रशिक्षण मांगरूळ येथील चिंचेश्वर मंदिरात चालू आहे. राजश्री शे...