कोतोलीच्या कुस्ती मैदानात कौतुक डाफळे विजयी
कोतोलीच्या कुस्ती मैदानात कौतुक डाफळे विजयी
*मनोजकुमार मस्के* - मांगरूळ
कोतोली - वारणा ता . शाहूवाडी येथे महाशिवरात्र यात्राउत्सवानिमित्त ग्रामपंचायत कोतोली व तुरुकवाडी यांचे सयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणेचा मल्ल कौतुक डाफळे याने रुस्तूम ए हिंद कुस्ती संकुल पुणेचा मल्ल समीर देसाई याला लपेट डावावर चितपट करून प्रेक्षणिय विजय मिळवला.
द्वितीय क्रमांकासाठी विकास पाटील (विटा) विरुद्ध सुदेश ठाकुर (सांगली) यांची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली . तृतिय क्रमांकाची प्रदिप पाटील विरुद्ध विकास बोरमाळे यांच्यात अटीतटीची चाललेली कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
प्रारंभी आखाडापूजन शाहूवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप पाटील , उदय कारखान्याचे माजी उपाध्यक्ष गणपती पाटील, भीमराव पाटील , पांडरंग आचरे, यात्रा कमेटी अध्यक्ष यशवंत पाटील , उपाध्यक्ष प्रदीप पाटील,संपत पाटील , बाळासाहेब पाटील , आनंदा पाटील , नामदेव पाटील, बंडा नलवडे, यांचे हस्ते झाले . यावेळी मैदानातील विजयी मल्ल पुढीलप्रमाणे - ॠग्वेद पवार, अथर्व भोसले ,यश बोडके, नयन माईंगडे, यशराज खबाले,अनुरुद्ध शिंदे , आकाश पाटील, पांडूरंग कोळापटे , श्रीधर निकम , विश्वजीत पाटील, गणेश पवार , तेजस लोहार , मयूर पाटील , आदेश मोहिते , साहिल पाटील, अनिकेत पोवार, प्रताप माने, सचिन महागावकर,सुरज पाटील या कुस्ती मैदानास ऑलिंपिकवीर बंडा पाटील- रेठरेकर, माजी उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव पाटील , उद्योजक सर्जेराव माईंगडे, माजी बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेरव पाटील, ॲड विक्रम कोळगे, उपमहाराष्ट्र केसरी महेंद गायकवाड, गोकुळ आवारे, माजी सरपंच अशोक कुंभार, उपसरपंच सहदेव कर्नाळे, संपत जाधव , कृष्णा पाटील, दत्ता राणे ,
कुस्ती हेच जीवनाचे रामदास देसाई, अशोक सावंत,
केडीसीसी बँकेचे निरिक्षक महादेव पाटील , दत्तसेवा पतपेढीचे पदाधिकारी लक्ष्मण पाटील, अशोक पाटील, बाबुराव पाटील, आनंदराव पाटील, आदींसह वारणा पंचक्रोशीतील कुस्ती शौकीन,कोतोली,तुरुकवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.
मैदानातील पंच म्हणून वस्ताद पांडुरंग पाटील, कुस्ती हेच जीवन चे संपत पाटील, प्रकाश पाटील,महेश पाटील,भीमराव माने, अंकुश नांगरे, संजय जाधव, मनोज मस्के, विजय मस्के, आदींसह वस्तादांनी काम पाहिले .मैदानाचे समालोचन कृष्णात चौगूले यांनी केले .
Comments
Post a Comment