मांगरूळ चिंचेश्वर मंदीरातील संसक्षण भिंतीच्या कामाला सुरुवात
मांगरूळ चिंचेश्वर मंदीरातील संसक्षण भिंतीच्या कामाला सुरुवात
मांगरूळ वार्ताहर
शिराळा तालुक्यातील मांगरूळ येथील चिंचेश्वर मंदिर परीसरात संरक्षण भित उभारण्याच्या कामाला नुकतीच सुरूवात झाली. या कामासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या आमदार फंडातून निधी देण्यात आला. सरपंच तानाजी आढाव, उपसरपंच संग्रामसिंह पाटील, सदस्य भगवान मस्के यांच्या प्रयत्नातुन हा निधी उपलब्ध करण्यात आला.
संरक्षण भिंतीच्या कामाला सुरूवात
मांगरूळ येथील जागृत देवस्थान श्री चिंचेश्वर मंदिर असून या मंदिरास संरक्षण भिंत बांधण्यासाठी भाविक व नागरीकांची मागणी होती. परंतु भिंत बांधण्यासाठी जागा अपुरी असल्याने भिंतीचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. भगवान रंगराव मस्के यांची जागा मंदिरालगत असल्याने त्यांना शिवाजी कुंभार व ग्रा. सदस्य भगवान मस्के यांनी विचारले असता, मंदिराची संरक्षण भिंत बांधण्यासाठी आपणाला जेवढी पाहिजे तेवढी जागा मी देण्यास तयार आहे असे सांगून भगवान रंगराव मस्के यांनी मंदिरासाठी काही अंशी जागा दान केली. त्यामुळे भिंत बांधण्याचा मार्ग मोकळा झाला. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या आमदार फंडातून ही भिंत मंजूर करण्यात आली. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता खुद्द जागामालक भगवान रंगराव मस्के, सरपंच तानाजी आढाव, ग्रामपंचायत सदस्य भगवान मस्के, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कुंभार, गावचे नागरिक अमोल खांडेकर यांच्या उपस्थितीत संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन सरपंच तानाजी आढाव ग्रामपंचायत सदस्य भगवान मस्के यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
चौकट- ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर ग्रामोदैवतापासूनच विकास कामाला माझी सुरुवात झाली. त्यामुळे मी प्रामाणिकपणे व टीकाऊ काम करणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य या नात्याने आश्वासन देतो
*भगवान मस्के*
ग्रामपंचायत सदस्य मांगरुळ
Comments
Post a Comment