NIS कोच राहुल खांडेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*!
मांगरूळ गावातील एकेकाळचा एक तुफानी मल्ल ते NIS कोच इथपर्यंतच्या खडतर मार्ग काढलेला शांत संयमी आणि उत्कृष्ट असा मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून ज्यांचं नाव अनेकांच्या मुखात असतं ते मांगरूळ गावचं लाडकं व्यक्तिमत्व राहुल खंडेकर... खरं पाहता राहुलला लहानपणापासूनच कुस्ती खेळाची आवड... त्यातच घरची परिस्थिती हलाखीची. वडील शेतकरी आई गृहिणी थोरला भाऊ संजय खांडेकर हा एक नॅशनल पैलवान...राहुलला तसं लहानपणापासूनच त्याच्या भावाचं मार्गदर्शन लाभलं. वडिलांनी व आईने केलेलं कष्ट राहुल लहानपणापासूनच पाहत आला होता. आपल्या आई-वडिलांनी व भाऊ संजय यांनी केलेले कष्ट राहुलला नेहमीच जाणवत होतं. त्यामुळे आपण काहीतरी करावं, या उमेदीने काम करणारा हा राहुल आज क्रीडा प्रशिक्षक ते NIS कोच पर्यंत पोहोचला...
राहुलचा स्वभाव शांत आणि संयमी असल्याने प्रत्येक गोष्ट राहुल समजून मगच करतो. त्यामुळे फार कमी कालावधीतच राहुल हा सर्वांचा आवडता झाला. सध्या राहुल त्यांच्याच देशभक्त करिअर अकॅडमी मध्ये अधिक्षक पदाची भुमिका व विद्यार्थ्यांचे मैदानी प्रात्यक्षिक घेत असतो. राहुल मैदानावर असतो त्यावेळेला एक कडक आणि शिस्तबद्ध शिक्षक म्हणून तो आपली ड्युटी बजावत असतो. राहुल मैदाना बाहेर असतो त्या वेळेला त्याच विद्यार्थ्यांसी मैत्रीचे नाते ठेवून असतो. राहुल ज्या वेळेला गावात असतो त्या वेळेला तो आपल्यातला सामान्य माणूस म्हणून असतो. आणि राहुल ज्यावेळी घरात असतो त्या वेळेला तो घरातील एक शांत आणि संयमी सदस्य म्हणून असतो. प्रत्येक वेळला प्रत्येक भूमिकेत आपले कर्तव्य बजावत असणारा हा राहुल आपल्या स्वभावाने अनेकांची मने जिंकतो. राहुल जितका शांत तितका तो कडक आहे. परंतु जिथे तापट भूमिका घ्यायची आहे तिथेच तो, ती भूमिका घेतो इतर वेळेला तळ्यातल्या पाण्याप्रमाणे संथ असतो...
आपली ड्युटी पाहून वडिलांना शेतात मदत करणारा राहुल आईच्या डोक्यावरली जळण्याची मोळी घ्यायला सुद्धा कधी लाजत नाही. अंगात बळ आहे म्हणून उगाच कुणावर तरी अरेरावी ची भाषा राहुलला कधी जमलीच नाही, आपलं काम भलं आणि आपण भलं या पलीकडे तो कधी गेलाच नाही, मैत्रीसी अतुट नातं जपणारा राहुल आज NIS कोच झाला तो मांगरूळ मधला पहिला व्यकती असेल असं मला वाटतं...
*आज राहुल चा वाढदिवस त्यानिमित्त त्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीचा प्रवास सुखकर जावो हीच सदिच्छा*!
मनोज मस्के - मांगरुळ
पत्रकार
Comments
Post a Comment