नारायणा..., तुला आणि तुझ्या बोलवत्या धन्यांना १०० पिढ्यांत मुंबई महाराष्ट्रापासून तोडता येणार नाही...
नारायणा..., तुला आणि तुझ्या बोलवत्या धन्यांना १०० पिढ्यांत मुंबई महाराष्ट्रापासून तोडता येणार नाही... ‘अन्यायायाने संतप्त झालेल्या तीन कोटी मराठी जनतेला वाघनखे फुटतील.... आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडणाऱ्यांचा कोथळा बाहेर काढला जाईल’ - आचार्य अत्रे, (१९५८ : शिवाजीपार्क भाषण) कर्नाटकचे उच्च शिक्षणमंत्री अश्वस्थ नारायण यांनी ‘मुंबई केंद्रशासित करा’ ही आगलावी भाषा मुद्दाम केलेली आहे. केंद्रात कोणाचेही सरकार आले तरी किंवा आताचे जे सरकार आहे, त्यांच्याजवळ पूर्ण बहुमत असले तरी .... मुंबई केंद्रशासित करणे कोणालाही शक्य होणार नाही. जर तसा प्रयत्न झाला तर त्या सरकाराचे येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता श्राद्ध घालील. महाराष्ट्रात हा प्रयोग ६५ वर्षांपूर्वी झाला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण होऊ नये म्हणून असे ५६ नारायण कोळून प्यायलेले फार दिग्गज नेते महाराष्ट्राच्या विरोधात सूड- कारस्थान करून बसलेले होते. त्यांचे अधीपती स. का. पाटील हे होते. रुतुभाई आडाणी होते... शांतीलाल शहा होते... बाबुभाई चिनॅाय होते... हा एक मोठा कट होता. मुंबई महाराष्ट्रापासून अलग क...