सढळ हाताची रूक्मिणी काकू, परतुनि येईल का?
*द्वितीय पुण्यस्मरण* *सढळ हाताची रूक्मिणी काकू, परतुनि येईल का*? मांगरुळ ता शिराळा येथील रुक्मिणी पाटील यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. लहानपणापासून मोठ्या पर्यत सर्व जण तिला काकू च म्हणत. सर्वांची आवडती आणि मायाळू काकू. कधी कोणाला उलट बोलणं नाही, कधी कुठल्या व्यक्तीला रागावणं नाही. सरळ आणि साध्या स्वभावाची काकू आज आपणाला सोडून गेली. रूक्मीणी काकू हि सढळ हाताची तिला सतत दुसऱ्याला काहीतरी द्यावं त्यामुळे आपल्याला सुख मिळतं असं तिचं मत, त्यामुळे ती सर्वांची आवडती होती. खरं तर केर्लीचे शामदत्त महाराज हे काकूंचे गुरू, त्यांची आज्ञा काकू तंतोतंत पाळत असे. महाराजांच्या सेवेत ती सतत असे. आपल्या घरावरील प्रेम आणि महाराजांवरील श्रद्धा तिची कधीच कमी झाली नाही. तिने आजपर्यंत परमेश्र्वराकडे स्वत:बद्दल काहीच मागीतले नाही. तर तिने आपल्या सुखी कुटूंबासाठी देवाकडे प्रार्थना केली. रूक्मीणी काकू दानधर्म सढळ...