सरपंच अशोक डिगे यांचा वाढदिवस

*आज मोरेवाडी येथील सरपंच अशोक डिगे यांचा वाढदिवस*.... 

खऱ्या अर्थाने  आजचा वाढदिवस हा अशोक डिगे यांच्यासाठी खूप मोलाचा आहे. कारण सलग तीन वर्ष त्यांनी सरपंच पदाची हॅट्रिक मारून धुरा आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण गाव गाडा हाकलेला आहे. शिवाय अनेक सवंगड्यांना अनेक कार्यकर्त्यांना त्यांचा मदतीचा हात नेहमीच पुढे आहे. नेहमी आडल्या- नडलेल्यांना मदत करणं, त्यांच्या पाठीशी उभा राहणं त्यांना खंबीरपणे साथ देणे, हे काम अशोक डिगे यांनी अनेकदा केले आहे.  आम्ही ते जवळून ही पाहिलेले आहे.  सर्वांशी गोड बोलून सर्वांशी मनमिळावू पणाने राहून गावच्या विकासासाठी जे काय करता येईल ते पुढे होऊन करणे हे अशोक डिगे यांना नेहमीच आवडत असते. गावामध्ये कशा सोयी सुविधा उपलब्ध होतील, या दृष्टीने विचार करणारा एक तरुण सरपंच म्हणून अशोक डिगे यांची ओळख संपूर्ण तालुक्यात आहे. गावगाडा हकत असताना अनेक तडजोडी कराव्या लागतात, आणि त्याही पूर्ण डोकं ठिकाणावर ठेवून कराव्या लागतात. अशा चाणक्य बुद्धीचा व हुशार सरपंच आहे. गावच्या विकासासाठी अशा तडजोडी अनेक वेळा अशोक डिगे यांनी केलेल्या आहेत.  नेहमी घरचं काम बाजूला ठेवून गावातील अडलेल्याचं काम प्रथम करणं हे जणू अशोकचं नेहमीचंच  आहे.  अनेक कार्यक्रमांमध्ये स्वतः  पुढाकार घेऊन काम करणं, एखादा व्यवसाय करत असेल तर त्याला मदत करणं, दवाखान्यात न्यायचे  असेल तर तिथपर्यंत जाऊन त्याला लागेल ती मदत करणे.‌ दुःखद प्रसंगी सुद्धा पुढे होऊन काम करणे अशा अनेक गोष्टी अशोक डीगे अवडीने करत  असतात. सरपंच म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून . आज अशा या तरुण तडफदार नेतृत्वाचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

 *शुभेच्छुक-: हॉटेल साई निसर्ग परिवार मोरेवाडी* 

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*