*वयोवृद्ध एसटी.... म्हाताऱ्यांच्या नशिबी*.....!
*वयोवृद्ध एसटी.... म्हाताऱ्यांच्या नशिबी*.....!
मनोज मस्के - मांगरूळ
महाराष्ट्र शासनाच्या नवीन कायद्यानुसार 75 वर्षाच्या वरील सर्वांना एसटी सवलत मोफत करण्यात आलेली आहे, ही योजना जरी आनंदाची असली तरी वस्तुस्थिती फारशी वेगळी आहे.
75 वर्षानंतर अनेक वृद्धांना मोफत एसटी सुरू करून सरकार नेमकं काय साध्य करणार आहे. खरं पाहता 75 वर्षाचे आजोबा एसटीत चढणार तरी का? हाच पडलेला मोठा प्रश्न आहे . त्यापेक्षा ६० वयानंतर एक महिना मोफत प्रवास पास त्यांना दिला तर किमान ती व्यक्ती चार तीर्थ तरी करू शकते असं अनेकांचं मत आहे.
75 वर्षानंतरचे जेष्ठ एसटीने कोणत्या कामासाठी घराबाहेर जाणार. नेमकं सरकारचं धोरण काय आहे! की ही वृद्धांची मांडलेली थट्टा आहे असं अनेक जण म्हणत आहेत. खरं पाहता ज्या योजनेचा लोकांना खरोखर फायदा होईल, अशा योजना अमलात येणे गरजेचे आहे.
‘वर्ष २०१३ देशाची लोकसंख्या १२१ कोटी असून ज्येष्ठ नागरिकांची संख्या १० कोटी आहे. देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या तेवढी असली, तरी यातील ६६ टक्के ज्येष्ठ नागरिकांना दोन वेळचे जेवणही आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. ९० टक्के ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक, आर्थिक, आरोग्य सुरक्षितता नाही. ७३ टक्के नागरिक निरक्षर असून केवळ शारीरिक श्रम करून ते जगू शकतात. ३९ टक्के ज्येष्ठ नागरिक आपल्या आयुष्याला दोष देत एकाकी आयुष्य जगत असतात, अशा प्रकारची माहिती ‘हेल्पेज इंडिया’ या सेवाभावी संस्थेने प्रसिद्ध केली आहे.
जेष्ठ नागरिकांना द्यायचं असेल तर सरकारने 75 वर्षानंतरच्या आजोबांना मोफत औषधे द्यावी. ती ही प्रत्येक मेडिकलमध्ये मिळतील अशी योजना करावी, खरी गरज ती आहे. आज अनेक वृद्ध औषधाविना तडफडत असताना दिसत आहेत. तर अनेकांना परिस्थीतीमुळे औषधेच घेता येत नाहीत. वृद्धांना दवाखाने मोफत करावेत. किमान गरीब शेतकरी आपल्या आई-वडिलांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाईल.
लोक आता शहाणी झालेली आहेत. सरकारच्या कोणत्या योजना कशा येतात ते त्यांना बरोबर माहिती आहे. आणि कोणत्या योजनेचा कोणाला फायदा होतो हेही माहित आहे.
सरकारला सुद्धा बरोबर ठाऊक आहे, की 75 वर्षाचे आजोबा एसटीत प्रवास करण्यासाठी येणार नाहीत, आणि जरी आले तर ते एखादे दुसरेच असतील. त्यामुळे अशा योजना दाखवून लोकांना आम्ही काहीतरी चांगलं काम करतोय असं फसवणं खरंतर सरकारने करू नये . आणि सरकारला जर वृद्धांना द्यायचं असेल तर त्यांना दवाखाना आणि औषध मोफत द्यावे. त्यांना खरी गरज मोफत औषधाची आहे. मोफत दवाखान्याची आहे. आधीच सरकारच्या जाण्याने वयोवृद्ध झालेल्या एसटीची नाही! एसटीचा खर्च कसाही ते भरू शकतात, परंतु दवाखान्याचा खर्च त्यांना परवडत नाही. मायबाप सरकार तेवढं वयोवृद्धंसाठी केलं तर लय बर होईल!.......
Comments
Post a Comment