सढळ हाताची रूक्मिणी काकू, परतुनि येईल का?
*सढळ हाताची रूक्मिणी काकू, परतुनि येईल का*?
मांगरुळ ता शिराळा येथील रुक्मिणी पाटील यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. लहानपणापासून मोठ्या पर्यत सर्व जण तिला काकू च म्हणत. सर्वांची आवडती आणि मायाळू काकू. कधी कोणाला उलट बोलणं नाही, कधी कुठल्या व्यक्तीला रागावणं नाही. सरळ आणि साध्या स्वभावाची काकू आज आपणाला सोडून गेली.
रूक्मीणी काकू हि सढळ हाताची तिला सतत दुसऱ्याला काहीतरी द्यावं त्यामुळे आपल्याला सुख मिळतं असं तिचं मत, त्यामुळे ती सर्वांची आवडती होती.
खरं तर केर्लीचे शामदत्त महाराज हे काकूंचे गुरू, त्यांची आज्ञा काकू तंतोतंत पाळत असे. महाराजांच्या सेवेत ती सतत असे. आपल्या घरावरील प्रेम आणि महाराजांवरील श्रद्धा तिची कधीच कमी झाली नाही. तिने आजपर्यंत परमेश्र्वराकडे स्वत:बद्दल काहीच मागीतले नाही. तर तिने आपल्या सुखी कुटूंबासाठी देवाकडे प्रार्थना केली.
रूक्मीणी काकू दानधर्म सढळ हाताने करत असे. मुलांनी खर्चाला दिलेले पैसे ती मंदिरांत दानधर्म करीत, अन्नदानावर खर्च करी मांगरूळमध्ये प्रत्येकवर्षी दसऱ्याला उपवास सोडण्यासाठी संपुर्ण महिलांना काकू स्वखर्चातुनच अन्नदान करीत, मांगरूळ येथील घरी आल्यानंतर घरातील सर्वांना खाऊ,कपडे आणत होत्या. मांगरूळातील घरी कमितकमी ५०-६० माणसं असतील एवढं मोठं कुटूंब .
रूक्मिणी काकू यांना तीन मुलं फत्तेसिंगराव कृष्णराव पाटील (विषेश पोलीस महानिरीक्षक), जयकर पाटील पुणे येथे शासकिय अधिकारी तर तीन नंबरचे संग्रामसिंह पाटील (संस्थापक चेअरमन कृष्णराव पाटील पतसंस्था मांगरूळ ) तिघांचाही राजकिय व सामाजिक क्षेत्रात पुढाकार अशा या त्रीमुर्तीची खऱ्या अर्थाने ती जिजाऊ होती. आपल्या आईवर जिवापेक्षा जास्त प्रेम हे तीनही भाऊ करत. काकूच्या सुना देखिल काकूवर आईप्रमाणे माया लावीत. दिर, जावा, पुतणे, नातवंड ही सर्वच काकूवर जिवापाड प्रेम करत.
तसं पाहिलं तर काकूंचे नेहमी एक वाक्य ठरलेलं असायचं ते म्हणजे आपण कधीही दुसऱ्यावर अवलंबून बसायचं नाही. आपले काम आपणच करायचे. दुसऱ्या माणसाला आपली सेवा करावी लागू नये. अखेर तिने आपला शब्द खरा केला. खडखडीत बोलतचालत गेलेली काकू आली ती मुठभर अस्थीच्या रूपात. आयुष्यभर दुसऱ्यांची सेवा करणाऱ्या काकूने मरणापुर्वीही कोणावर बोजा दिला नाही. पण मरणानंतरही कोणावर बोजा न देता सहज अनंतात विलीन झाली. अशा या सडळ हाताच्या रुक्मिणी काकू यांना दुतीय पुण्यस्मरणा निमीत्त भावपूर्ण अभिवादन !
Comments
Post a Comment