*कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पै. रामदास देसाई (सर) वाढदिवस विशेष लेख.....*
रामदास देसाई वाढदिवस ज्यांच्याजवळ आयुष्यातील सगळी गुपित उघडी करावीत,समोर कितीही दुःखाचे डोंगर असले तरी ज्यांच्याशी बोलल्यावर त्या अवघड डोंगराची चढण सोपी व्हावी;* दाट धुक्यात वाट हरवल्यावर क्षणातच कुणीतरी बोट धरून मी आहे रे सोबत...! असं हक्काने म्हणावं; अगदी असचं आजचं व्यक्तिमत्त्व आहे. आमचे मित्र कुस्ती हेच जीवन चे संस्थापक अध्यक्ष मा. रामदास देसाई सर, असं त्यांचं नाव... कोणताही माणूस जवळ आल्यावरच समजतो. मी सरांना फोन केला आणि त्यांच्या कामाबाबत विचारणा केली असता. अत्यंत जिव्हाळीने आणि मनापासून कुस्ती वाढावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे जाणवले. सन 2017 फेसबुक पेज 'कुस्ती हेच जीवन ' नावाने सुरू करण्यात आले. कुस्ती विषयी माहिती, खुराका विषयी माहिती, पैलवान कसा घडला जातो या विषयावर माहिती, अनेक पैलवानांचे कुस्तीचे व्हिडीओ या माध्यमातून अनेक देशात 'कुस्ती हेच जीवन ' पोहचले. पण म्हणतात ना चांगले काम करत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्याच प्रमाणे रामदास सरांच्या या कार्यात अनेक अडचणी आल्या, पण सत्याच्या पाठीशी ने...