माझ्या सुखदुःखात माझ्या पाठीशी खंबीरपणे साथ देणारी बायको

आयुष्य जगत आसताना आपणाला जन्म देणारे आपले आईवडील आसतात. ज्यांच्या उदरी आपण जन्म घेतला ज्यांचे बोट धरून आपण चालायला शिकलो, ज्यांच्या जिवावर आपण बिन्धास्त असतो ते दैवत म्हणजे आपले आई वडील त्यांच्या चरणी नतमस्तक. 
     या नंतर आपल्या आयुष्यात आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपली धर्मपत्नी . जिच्या जिवावर आपण आपले पुढचे आयुष्य जगत आसतो. गाडीची दोन चाके म्हणजे संसार, त्यातले एक चाक जरी बिघडले तरी आयुष्याचं गणीतच जणु बिघडते. 
          माझे लग्न 20 एप्रील 2006 रोजी झाले. आज माझ्या लग्नाला १8 वर्ष झाली. या काळात अनेक सुख-दुख: तिने माझ्यासोबत सोसली. पण कधीही तने तक्रार केली नाही. माझ्या वडीलांच्या निधनानंतर या १8 वर्षाचा काळात  कुटूंबाव्यतीरीक्त कशाचाही विचार तीने केला नाही. कधीही कोणत्या गोष्टींचा हट्ट केला नाही. माझ्या आईला तीने आपली आई मानली, माझ्या भावांना तीने आपले भाऊ मानले, भावजांना तीने बहीण मानलं. कितीही कामाचा ताण  झाला तरी सदैव चेहरा हसरा ठेवून होणारा ताण तीने कधी जणवू दिला नाही. घरात सर्वांशी मनमिळावू पणाने कसं वागावं हे मात्र तिच्या कडूनच शिकाव. कधी कोणाशी वाद नाही, मनात असेल ते लगेच बोलून दाखविणे. मनात एक आणि ओठात एक असलं वागणं तीला जमतच नाही.  
        सासू व जावां यांच्याशी तर मैत्रीणी  सारखं नातं. जावा-जावा बोलायला लागल्या की अनेकजण म्हणतात आरे या एकतर मैत्रीणी आसाव्यात, किंवा बहिणी. असं अनेक लोकांनी बोलून दाखवले. घरात एका विचारांनी राहणं आणि ते सुद्धा महिला वर्गात हे काही ठराविकच घरात पहायला मिळते.  त्यापैकी एक आमचे घर हे नक्की.  तीला कोणतीही गोष्ट हवी असल्यास ती अगदी आईकडे मागीतल्याप्रमाणे आपल्या सासुकडे हट्ट करते. दिरांना ती भाऊ मानते शिवाय एखादी हवी असलेली गोष्ट ती हक्काने मागून घेते. घराचं घरपण कसं जपावं हे तिच्याकडूनच शिकावं.
      मी मात्र तीला काहीही देऊ शकलो नाही.  कारण घरात माझे भाऊ वहिणीने सांगताच आणून देतात. त्यामुळे माझ्याकडे मागण्याची वेळच तिच्यावर आली नाही.  माझ्याकडे जर मागीतलेच तर बाहेर गेल्यावर आईस्क्रीम मात्र मागते. तसं सहसा कुठे फिरायला जातच नाही म्हणा, जर गेलोच तर अंत्री येथील स्वामी धाम येथे स्वामींच्या दर्शनाला तसं एरवी आम्ही सर्व एकत्र कुटूंबासोबतच जातो. 
आज १९ आक्टोंबर तीचा वाढदिवस त्यानिमित्त. तसं आमच्या लग्नाला १८ वर्ष संपली असल्याने तीच्या बाबतीत लिहावसं वाटलं कारण शब्दापलीकडं मी काहीच देऊ शकत नाही. आज जीनं माझ्या घराला घरपण दिलं . मला व माझ्या कुटूंबाला आपलं जीवन माणलं आशा माझ्या पत्नीला आयुष्य माझ्यापेक्षा जास्त लाभो हिच स्वामी चरणी प्रार्थना. 

💁 स्वच्छ, सुंदर,पवित्र घर 🏡
बायकोमुळेच असतं...
नवरा नावाचं विचित्र माणूस
तिलाच हसत बसतं !

वय कमी असून सुद्धा
बायको समजदार असते..👩👱
बायकोपेक्षा नवऱ्याचे वय👴👨
म्हणूनच जास्त असते !

💁तिचा दोष काय तर म्हणे
चांगल्या सवयी लावते !
कुटुंबाच्या कल्याणासाठी🏃
दिवस रात्र धावते !

🙅 चिडत असेल अधून मधून
सहनशीलता संपल्यावर;
तुम्हीच सांगा काय होणार
चोवीस तास जुंपल्यावर ?

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹
         

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*