*मा उपसरपंच , मा गोरक्ष सावंत (सर) वाढदिवस विशेष लेख••••*

*मा उपसरपंच , चिकुर्डे आश्रम शाळा मुख्याध्यापक मा गोरक्ष सावंत-पाटील (सर) वाढदिवस विशेष लेख••••*
*.......................... 
✍ *पै अशोक सावंत/ पाटील*
----------सोंडोली------- 

*शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली गावचे सुपुत्र  मा. उपसरपंच *मा. गोरक्ष सावंत/पाटील (सर)* यांचा आज वाढदिवस.... 

    वाढदिवस म्हटले की त्या व्यक्तीच्या बद्दल चांगले वाईट लिहण्याचा शिरस्ता, पण खर्या अर्थाने सर्व सामान्य व्यक्ती मत्व म्हणून ज्यांच्या कडे पाहिले जाते असे गोरख सावंत सरांच्या विषयी मी आज लिहिणार आहे.... 


      सरांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले, खरंच त्यांचा शिक्षणाचा पाया कुणी रचला असेल तर तो म्हणजे *हातकणंगले तालुक्यातील नरंदे गावचे शिक्षक आप्पासाहेब पाटील गुरुजी यांनी*... पाटील गुरुजी यांचे गोरख सरांना घडवण्यात मोठे कष्ट आहे, परवाच मी एक लेख लिहिला होता प्रसिद्ध व्यवसायिक मा बाळु चोपडे यांचा..... हे बाळु चोपडे सुद्धा याच पाटील गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली तयार होऊन त्यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल केली, आणि ते आज स्वतः ला सिद्ध करत आहेत... पाटील गुरुजींनी अनेक विद्यार्थी घडवण्याचे मोठे काम केले आहे.काल च गुरुपौर्णिमा झाली आणि आज गोरख सावंत सरांचा वाढदिवस.  पाटील गुरुजी यांना गुरुस्थानी मानुन शैक्षणिक क्षेत्राची वाटचाल केली, आणि ती यशस्वी सुद्धा झाली.  म्हणून मी म्हणतो पहिले आपले ध्येय निश्चित करा, आणि त्या दिशेने वाटचाल सुरू करा. सरांनी त्यांची वाटचाल निश्चित करुन हे यश संपादन केले. आणि १९९९ साली शिक्षक म्हणून *यशवंत आश्रम शाळा चिकुर्डे येथे ते रुजु झाले*. 
      
  खरोखरच आभाळाला हात टेकले तरी पाय जमिनीवर असणारी ही व्यक्ती अगदी प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर , प्रसिद्धी च्या शिखरावर पोहचुन सुद्धा साधी राहणीमानी आणि उच्च विचारसरणी असणारे हे व्यक्ती मत्व खरोखरच कार्यकर्तृत्व संपन्न आहे असं मला याठिकाणी म्हणावे लागेल.  
      लहानपणापासून लाभलेली अलौकिक बुद्धिमत्ता, दुर्दम्य इच्छाशक्ती, मोठा आशावाद, त्याग करण्याची वृत्ती, कष्ट करण्याची प्रचंड ताकत, शिक्षणावरची श्रद्धा या जोरावरती आज सरांनी आपल्याला सिद्ध केले आहे. 
            सरांचा जन्म शेतकरी कुटुंबातला....एकत्र मोठा परिवार....लहानपणापासूनच सरांना शिक्षणाची आवड, पण म्हणतात ना फक्त आवड निर्माण झाली म्हणजे सर्व काही होते असे नाही, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, आणि अपार कष्ट करावे लागते. दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करून प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनती च्या जोरावर गोरक्ष पाटील सरांनी शैक्षणिक क्षेत्रातील हे यश मिळवले, *आणि एक विध्यार्थी गोरक्ष सावंत ते शिक्षक आणि आता मुख्याध्यापक सर म्हणून वाळवा तालुक्यातील चिकुर्डे या गावात कार्यभार सांभाळत आहेत*. 
                  प्रत्येक माणसाच्या जीवनात गुरू असावा लागतो, गुरू विन न मिळे ज्ञान, ज्ञानाविन न होई जगी सन्मान, जिवन हो सागर तराया चला उमदो गुरुराया..... या ओळींप्रमाणे सरांनी जे आपल्या गुरुस्थानी आहेत त्यांना गुरु मानुन त्यांचा आदर्श घेऊन हे यश संपादन केले आहे. आणि आता गेली अनेक वर्षांपासून *यशवंत प्राथमिक आश्रम शाळा  चिकुर्डे* ता. वाळवा या ठिकाणी *मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत* 
                     अनेक वर्षे शिक्षक म्हणून विद्यादानाचे काम करत असताना, गावच्या सुद्धा विकासात्मक दृष्टीने त्यांनी पावले उचलायला चालु केली,  गावासाठी कोणतेही काम करण्याची  उर्जा त्यांच्या मध्ये होती. जे आपल्या कडे आहे ते दुसर्या ला देण्यासाठी दानत असावी लागती,ती सरांच्या जवळ होती किंबहुना आहे, मग ते कोणत्याही स्वरूपात दिले तरी अनेकांना त्या माणसाबद्दल आपुलकी निर्माण होते, सर स्वत सर्वांशी आपुलकीने बोलतात, अशा या वागण्याने *अल्पावधीतच लोकप्रिय झाले आणि गावाने त्यांना उपसरपंच म्हणून निवडून दिले*.आणि ज्ञानदानाबरोबर गावाची सेवा करण्यासाठी त्यांना वेगळे असे व्यासपीठ मिळाले. 
                     या संधीचे सोने करत त्यांनी गावात विविध प्रकारच्या योजना अमलात आणल्या आणि त्याचा पुरेपुर फायदा सोंडोली ग्रामस्थांना झाला. 
                     ज्या व्यक्ती जवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते,त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते....या ओळी प्रमाणे सरांनी सर्व अडचणी वर मात करुन आपल्या संयमी वृत्तीने अनेकांना आपलेसे केले आहे. 
         कोरोणा सारख्या प्रचंड महामारीत आपले गाव कसे सुरक्षित राहील याची पुरेपुर काळजी सरांनी गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत मार्फत योग्य ती खबरदारी घेऊन कोरोणाला लांबच ठेवले. *तसेच कोरोणा च्या काळात शाळा बंद असुन सुद्धा त्यांनी आपल्या शाळेत समुह अध्यापनामार्फत विद्यादानाचे धडे दिले*, याचा आदर्श जिल्ह्यातील अनेक शाळांनी घेतला. तसेच या शाळेतील निवासी विद्यार्थी यांच्या कडे विशेष लक्ष देऊन शाळेचा पट कसा वाढावा याकडे लक्ष केंद्रित केले आहे,  २०१४ साली सरांना आदर्श मुख्याध्यापक म्हणून  पुरस्कार सुद्धा मिळाला आहे*. 
          गावचे उपसरपंच म्हणून त्यांचा कार्य काळ गेल्या वर्षी संपला आहे, पण कोणतेही पद नसताना सर सतत गावातील उपाय योजनेबाबत नेहमी अग्रेसर असतात, 
                              राजकारणापेक्षा समाजकारण हे एकच ध्येय सरांच्या सतत डोक्यात असणारे व्यक्तीमत्व गावाला लाभले त्याचा सर्व ग्रामस्थांना अभिमान आहे. 
                              शाहु महाराजांची वैभवशाली परंपरा व विचार जोपासणारे, एक उच्चशिक्षित असणारे, कुस्ती सारख्या रांगड्या खेळावर प्रेम करणारे कुस्तीवेडे, कुस्तीप्रेमी मा उपसरपंच *मा. गोरक्ष सावंत/पाटील* (सर) सोंडोलीकर होय....
                                   स्वताच्या गावच्या यात्रेत एक मोठे कुस्ती मैदान भरवण्यासाठी त्यांचा मोठा वाटा असतोच, शिवाय कुस्ती सुद्धा पुरस्कृत करतात, दोनच वर्षांपुर्वी गावच्या तालीम नुतनीकरणासाठी भरीव अशी मदत केली आहे. *कुस्ती वाढीसाठी कुस्ती खेळावीच लागते ही व्याख्या खोडून काढत सर नेहमी कुस्ती या खेळाला चालना देत असतात*. 
                                        वेद वाचणे कदाचित सोपे परंतु वेदना वाचणे अतिशय अवघड ज्यादिवशी वेदना वाचता आल्या त्यादिवशी ईश्वर प्राप्तीचा पहिला दिवस, आज सरांनी सुद्धा सामान्य लोकांच्या वेदना वाचल्या आहेत, *सरांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य शब्दात सांगता येणार नाही आणि लिहुनही संपणार नाही*. 
                                             आयुष्यात  मुलांना विद्यादानाचे आणि गावाची सेवा करण्यात आपले जीवन व्यतीत करणारे सर, मुख्याध्यापक आणि गावचे मा. डेपोटी सरपंच म्हणून पंचक्रोशीत त्यांची ख्याती आहे. 
                                             कोणावरही अन्याय न करता न्यायदानाचं,व विद्यादानाचं त्यांचं काम मी अनेक वर्षांपासून माझ्या डोळ्यादेखत पाहत आलो आहे. 
                                                  आजपर्यंत निष्कलंक, चारित्र्य संपन्न असा कार्यकाळ त्यांनी सांभाळला आहे... 
                                                  आमचे मार्गदर्शक, आमचे जवळचे मित्र, निस्वार्थी आणि अभ्यासु व्यक्ति मत्वाचा आज वाढदिवस आहे त्यांना *कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य* कडून *वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा*
                                                  ••••••••••••••••••••••••
धन्यवाद
*पै अशोक सावंत/पाटील* कुस्ती संघटक
**कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य* 
अध्यक्ष शाहुवाडी तालुका
मो. 9702984006

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*