*मा विश्वास (भाऊ) माईंगडे वाढदिवस विशेष*.

*मा विश्वास (भाऊ) माईंगडे वाढदिवस विशेष*...... 
........................... 
*लेखन- पै अशोक सावंत/पाटील* सोंडोलीकर
......................... 
  शाहुवाडी तालुक्यातील तुरुकवाडी गावचे सुपुत्र मा *विश्वास माईंगडे यांचा आज जन्म दिवस* ...... 
  भाऊंच्या विषयी बोलायचे झाले तर मी इतकंच म्हणेन की शांत ,संयमी व्यक्तीमत्व... 
भाऊंचे बालपण गावाकडे च गेले, शिक्षण ही गावाकडे च पुर्ण झाले, भाऊंची एक ईच्छा होती, की देशसेवा करायची, म्हणजे आर्मीत भरती व्हायचे, त्या दृष्टीने भाऊंनी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, भरपूर मेहनत,जिद्द, चिकाटी,आणि इच्छा शक्तीच्या जोरावर भाऊ १९९६ साली सैन्यात भरती झाले, पन ट्रेनिंग च्या वेळी त्यांच्या कमरेला  गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचे देशसेवेचे स्वप्न अपुरे राहिले, आणि त्यांना गावाकडे यावे लागले.पण त्यानंतर काही दिवस असेच गेले. *त्यानंतर ते २००१ साली मा आनंदराव माईंगडे दादा संस्थापक असणाऱ्या दत्त सेवा उद्योग समूहामध्ये नोकरीला लागले*,ते आजही त्या ठिकाणी कार्यभार सांभाळत आहेत. मुंबईत मालवणी याठिकाणी असणाऱ्या दत्त सेवा पतपेढी मध्ये  ते जॉबला आहेत. 
त्याठिकाणी त्यांनी वसुली अधिकारी म्हणून पहिल्यांदा कार्यभार सांभाळला, त्यानंतर शाखा अधिकारी, *आणि आता 'विभागीय अधिकारी' म्हणून ते कार्यरत आहेत*... 
   आनंदराव माईंगडे दादांचे ते अगदी जवळचे विश्वासू सहकारी आहेत.. आणि ज्याच्या नावातच विश्वास आहे असे विश्वास भाऊ दादांच्या अनुपस्थितीत सर्व काही सांभाळत असतात.. भाऊंचे कुस्ती वर असणारे प्रेम सर्वश्रुत आहे, *भाऊनी आपला मुलगा नयन माईंगडे याला पैलवान केले आहे, अहो पैलवान मुलगा करायला वाघाचे काळीज असावे लागते,रक्तात कुस्ती असायला लागते. नयन हा त्यांचा मुलगा दत्त सेवा विद्यालयाचा तुफानी पैलवान आहे.. *गेल्या १० जानेवारी रोजी कुस्ती हेच जीवन आयोजित मैदानात त्याने प्रेक्षणीय विजय मिळवून प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती..* आणि या मैदानाची सर्व तयारी करण्यात विश्वास भाऊ यांचा मोठा वाटा होता.. मैदान कुस्ती हेच जीवन चे पण विश्वास भाऊ मुंबई वरुन गावी दोन दिवस वेळ काढून आले होते,आणि जी काही मदत लागेल ती त्यांनी त्याठिकाणी दिली होती *याला म्हणतात कुस्ती वरील प्रेम, लाल मातीवरील प्रेम*......
   खरंच सांगतो विश्वास भाऊ यांनी आयुष्यात येऊन काही कमवले तर ती म्हणजे माणुसकी, आणि प्रेम, आपल्या प्रेमळ स्वभावाने अनेकांना त्यांनी आपलेसे केले आहे. कोणालाही वाईट बोलने नाही सर्वांशी आपुलकीने ते बोलत असतात. 
अशा या सहृदयी व्यक्तीमत्वाचा आज वाढदिवस आहे *त्यांना कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य कडून या छोट्याशा शब्दरुपी शुभेच्छा*...
•••••••••••••••••••••••|
धन्यवाद
*पै अशोक सावंत/ पाटील* कुस्ती संघटक
*कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य*
अध्यक्ष शाहुवाडी तालुका
मो 9702984006

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*