योगगुरू अविनाश धस यांच्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण माहिती सांगणारा लेख

माणसाचं मस्तक पुस्तकाणे बदलतं आणि न होनारं धाडस आपोआपच आंगात येते. ही कहाणी आहे सांगली जिल्हा शिराळा तालुक्यातील बिळाशि गावचे सुपुत्र योग गुरू पै. अविनाश धस यांची . 
      सन 1993 मराठवाडा केसरी किताबाचा मानकरी कुस्तीचे भयंकर वेड, व्यायामाची आवड त्याच बरोबर स्वमी विवेकानंद यांच्या पुस्तकांचा पडलेला प्रभाव. अविनाश धस यांचे शिक्षण बिळाशि येथील वारणाप्रसाद विद्यालयात झाले. कुस्तीत आणि अभ्यासात ते प्रचंड हुशार होते. स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक वाचुन तर ते चक्क विवेकानंदांच्याच   भुमिकेत गेले. 
        मला देशासाठी काहीतरी करायचे आहे या विचारांनी त्यांच्या डोक्यात थैमान घातले होते . त्याच दरम्यान त्यांनी बी.ए.एम.पी.एड. पुर्ण केले. नंतर ते सोलापुरला दिलीप महाविद्यालयात शारीरिक शिक्षक म्हणून रूजू झाले. दरम्यानच्या काळात त्यांना  योगा ॑ करण्याचा छंद जडला. योगा ईतका मनावर जडला की अविनाश धस हे नोकरी सोडून थेट पुण्यातील रामकृष्ण मठात त्यांनी सहा वर्ष,  तर कोलकत्याच्या बेलुर मठात दोन वर्ष सेवक म्हणुन काम केले. 
          पुण्याच्या मठात असताना परिसरातील पानमळा, दांडेकर पूल झोपडपट्टी परिसरातील मुले धस यांच्याकडे योगा शिकायला यायची. त्यांना योगा शिकवत त्यांनी योगालाच पुर्णपणे जवळ करण्याचे ठरविले. त्यानंतर स्वतंत्रपणे योगाभ्यासाचे धडे देण्यास सुरवात केली. गरिब होतकरू, झोपडीत राहणारी मुले. कृष्णा पालखे, सागर नलावडे, कमलेश झा, निखील दिक्षीत, सुनिल शिवतारे, कृष्णा काळे ही सर्व गरिब मुले धस यांच्या हाताखाली शिकुन जागतीक स्पर्धेत त्यांनी योगाची चमक दाखवली. 
        जागतिक योग करंडक स्पर्धेत याच गरिब मुलांनी इतिहासच घडवला. योगाची सुरूवात भारतात झाली असताना हा करंडक भारताऐवजी सिंगापुरला जाणार की काय अशी परिस्थीती निर्माण होती. परंतु या गरिब मुलांनी जागतीक स्पर्धा जिंकुन तो करंडक  भारतात आणला. आणि योगाची जन्मभुमी भारतच आहे हे साऱ्या जगाला दाखवून दिले. यामागे अविनाश सरांचे खुप मोठे कष्ट होते हे विसरून चालणार नाही.
       यानंतर धस आता योगाच्या आभ्यासाकडे अधिक लक्ष पुरवित आहेत. आजपर्यंतच्या सखोल अभ्यासातून त्यांनी तब्बल ६४४ योगासने व १५० योग मनोऱ्याची निर्मिती केली आहे. पृष्ठकंदासन, विपरीत कंदासन,द्विपादबद्ध मयूरासन, उदरपादबद्ध विपरीत उत्थित पादासन, उदरपादबद्ध उष्ट्रासन, पृष्ठपादासनयुक्त भूसासन यासारख्या आसनाचा त्यात सामावेश आहे. यातील बरिचशी आसने अवघड आहेत. या संसशोधनाला धस यांच्या सोबत या चिमुकल्यांचाही हातभार आहे. 
      योगामुळे माणसाची शारीरिक, माणसिक कार्यक्षमता वाढते. परदेशातील लोकांनाही त्याचे महत्व पटले आहे. मात्र आपल्या देशात तितकीशि जागृती दिसत नाही असे योगगुरू प्रा. अविनाश धस यांनी सांगितले.  तसेच योगाचा प्रसार अधिकाधिक  व्हावा यासाठी नविन असनांची निर्मिती सुद्धा केली आहे. या आसनांचा प्रयोग शाळाशाळांत घेण्याचा विचार आहे. व यावर पुस्तकही लीहीत आहोत असे धस म्हणाले. 
         योगा हा खेळासाठी उपयुक्त असुन अनेक व्याधिंना दुर करायची ताकद योगामध्ये आहे. अनेक मल्लाकडुन प्रशिक्षणाची मागणी होत आहे. तसेच योगाचा समावेश आॅलिंपिकमध्ये व्हावा असी अपेक्षा धस यांनी व्यक्त केली.

मनोज मस्के
       

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*