Posts

Showing posts from May, 2021

मांगलेचा देवदुत डॉक्टर ओकांर पाटील*

Image
*मांगलेचा  देवदुत  डॉक्टर ओकांर  पाटील*         मांगले :पुण्यनगरी   श्री राम समर्थ हाँस्पिटल रुग्णांसाठी आरोग्य पंढरी     कोरोना काळात  स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता जीवाचं रान करून अखंडपणे रुग्ण सेवा देत आहेत ते डॉक्टर त्यापैकी एक  मांगले ता शिराळा येथील डॉक्टर ओकांर  पाटील आहेत श्रीराम समर्थ हाँस्पिटलच्या व शिराळा उप जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी स्वस्तिक हाँस्पिटल शिराळा या  माध्यमातून कोरोना काळात ग्रामीण भागात अहोरात्र रुग्णसेवा सुरू आहे मांगले सारख्या ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेऊन रशिया येथील होल्वोग्रार्ड या नामांकित युनिव्हर्सिटीत MBBS  शिक्षण घेतले व बालरोगतज्ज्ञ हे शिक्षण पुर्ण केले यावेळी कोल्हापूर वारणा  कोडोली या ठिकाणी हाँस्पिटल उभा करुन लाखो रुपये मिळवू शकले असते पण वारणा व मोरणा संगमावरील व  मंगलनाथाच्या छायेखाली असणाऱ्या मला माझ्या गावात  रुग्ण सेवा करायची आहे माझ्या  शिक्षणाचा उपयोग माझ्या गावासह शिराळा तालुक्याला  झाला पाहिजे लहान थोरा...

*पत्रकार विजय गराडे यांच्या कडुन वाँर्ड आँक्सीजन सिंलेडरची सोय*

Image
      *पत्रकार विजय गराडे  यांच्या  कडुन वाँर्ड आँक्सीजन  सिंलेडरची सोय*                 मांगले प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सर्वच गावात  कोरोना रुग्ण संख्या वाढत  असुन अनेक रुग्णांची आँक्सीजन लेव्हल कमी आल्यामुळे अनेकांना  पुढील उपचारासाठी उपजिल्हारुग्णालय शिराळा, कोकरुड किंवा खाजगी  हाँस्पिटलला अँडमिट करावे  लागत आहे. यावेळी अँम्बुलन्समधुन रुग्णांना  वाँर्ड आँक्सीजन सिलेंडर लावुनच न्यावे लागत आहे.   याची गांभीर्याने दखल घेवुन  मांगलेतील प्रशासणाला सहकार्य करणारे पत्रकार विजय गराडे  यांनी  रुग्नाच्या सोयीसाठी  पाच आँक्सीजन वार्ड सिंलेडर प्राथमिक आरोग्य केंद्रास मोफत भरुन दिले.             मांगले येथील प्राथमिक आरोग्य विभागात आँक्सीजन सुविधा उपलब्ध आहे. मांगले सह शेजारच्या बारा गावातील पेंशट उपचारासाठी मांगले येथे येत आहेत. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहेत  या पाश्र्वभूमीवर  हाँस्पिटल बेड आँक...

कॉंग्रेस-पराभवाच्या अहवालाने उत्तर मिळणार नाही! लढून मरायच की बुडुन मरायचं... एवढच ठरवा...!

Image
*कॉंग्रेस-पराभवाच्या अहवालाने उत्तर मिळणार नाही!  लढून मरायच की बुडुन मरायचं... एवढच ठरवा*...! *मधुकर भावे/उत्तर-दक्षिण* पाच राज्यातील कॉंग्रेसच्या पराभवाची दखल पक्षाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी गंभीरपणे घेतलेली आहे. पराभव का झाला? पराभवातून कोणता धडा घेण्याची गरज आहे? केरळ आणि आसाम या दोन राज्यात सत्तारुढ पक्षाला (डावे कम्युनिस्ट आणि भाजप) कॉंग्रेस पक्ष सत्तेवरुन खाली का खेचू शकला नाही? पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेस पक्षाची पाटी का कोरी राहीली? असे चार महत्वाचे प्रश्न सोनिया गांधी यांनी उपस्थित केलेले आहेत. कॉंग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत उपस्थित असलेल्या सदस्यांपैकी, या प्रश्नांची उत्तरे कोणी दिली आहेत का? आणि उत्तरे शोधून काढली आहेत का? याचा तपशील समोर आलेला नाही. परंतु बहुधा कोणत्याही सदस्यांने या पराभवाबद्दल विश्लेषण केले असेल असे वाटत नाही. या पराभवाची चौकशी करुन अहवाल सादर करण्याकरिता श्री अशोक चव्हाण यांची समिती नेमण्यात आलेली आहे. त्यासाठी समितीचे चार सदस्य देशभरातून नियुक्त केलेले आहेत. पराभवाची राज्य पाच आहेत, १५ दिवसांत अहवाल द्यायचा आहे. कोरोनामुळे सगळ्या...

सागावचा देवदूत डॉ दिलीप पाटील

Image
*सागावचा देवदूत डॉ दिलीप पाटील*  जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटकाळात सिमेवरील जवानाप्रमाणे स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता जीवाचं रान करून अहोरात्र झटत आहेत ते डॉक्टर्स.  या महामारीत मृत्यूच्या जबड्यातून रुग्णांना परत आणतांना काही डॉक्टर्स ही या कोरोनाच्या बाधेने घायाळ होताना दिसतात.  तरीही न डगमगता धैर्याने आलेल्या परिस्थितीशी झुंजणारे अनेक योद्धे आहेत. सागाव ता शिराळा येथील  डॉक्टर दिलीप पाटील व डॉक्टर जयश्री पाटील होय     या कोरोनाविरूध लढाईत वैद्यकीय क्षेत्रात  एख वर्षापासून अहोरात्र रुग्ण सेवा देत आहेत हे काम करताना सागाव येथील  डॉक्टर दिलीप  पाटील व डॉ जयश्री पाटील  कोविड पाँझीटिव आले.  मात्र हे  कोविड  योध्दे'बचेंगे तो और भी लढेंगे' या उक्तीप्रमाणे   कोरोनाच्या छाताडावर पाय देवून  कोरोना विरुध्द लढाईत जिंकले. ग्रामदैवत भैरवनाथाच्या  आर्शिवादाने  कोरोना मुक्त झाले पण जो मला व माझ्या कुटुंबातील सर्वांना त्रास झाला तो दुसऱ्या कोणाला होवू नये या स्वच्छ व प्रामाणिक हेतूने पुन्हा ...

महाराष्ट्र कुठे होता? महाराष्ट्र कुठे चालला आहे? साठ वर्षांचे ऑडिट कोण करणार?

Image
महाराष्ट्र कुठे होता? महाराष्ट्र कुठे चालला आहे? साठ वर्षांचे ऑडिट कोण करणार? महाराष्ट्रासाठी लढले कोण? हुतात्मे झाले कोण आणि गब्बर झाले कोण? मधुकर भावे/उत्तर-दक्षिण आज ६१ वर्षे झाली.  १ मे १९६० ते १ मे २०२१ .  बघता बघता एका महान लढ्याचा ६१ वर्षांचा काळ कधी संपलाकळलंच नाही. ‘मराठी भाषिक माणूस’ मुंबईसह संयुक्त महाराष्टÑ’ या एकाच मागणीसाठी असा काही एकवटला होता की, या एका विषयापुढे बाकी सगळे विषय झुठ होते, खोटे होते, लहान होते. हा लढा असा होता की, जो-जो संयुक्त महाराष्टÑाच्या लढयाचा, तो-तो महाराष्टÑाचा, अशी एक व्याख्याच तयार झाली होती. कोणी जात पाहिली नाही, कोणी धर्म पाहिला नाही.नेता पाहिला नाही आणि कोणता पक्षही पाहिला नाही. संयुक्त महाराष्टÑ समिती हाच एक नवा पक्ष तयार झाला होता.  जो या पक्षाचा उमेदवार, तो आमचा उमेदवार ही महाराष्टÑाची भावना त्या एकाच निवडणुकीत पाहायला मिळाली. जात, धर्म, पैसा गाडून आपल्या बैलगाड्या, आपले छकडे बाहेर काढून, आपल्या दशम्या, आपलाझुणका, आपली शिदोरी बरोबर घेऊन जात-धर्म विसरुन सर्व कार्यकर्ते निवडणुकीला बाहेर पडले. १९५७ ची विध...