*पत्रकार विजय गराडे यांच्या कडुन वाँर्ड आँक्सीजन सिंलेडरची सोय*
*पत्रकार विजय गराडे यांच्या कडुन वाँर्ड आँक्सीजन सिंलेडरची सोय*
मांगले प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सर्वच गावात कोरोना रुग्ण संख्या वाढत असुन अनेक रुग्णांची आँक्सीजन लेव्हल कमी आल्यामुळे अनेकांना पुढील उपचारासाठी उपजिल्हारुग्णालय शिराळा, कोकरुड किंवा खाजगी हाँस्पिटलला अँडमिट करावे लागत आहे. यावेळी अँम्बुलन्समधुन रुग्णांना वाँर्ड आँक्सीजन सिलेंडर लावुनच न्यावे लागत आहे. याची गांभीर्याने दखल घेवुन मांगलेतील प्रशासणाला सहकार्य करणारे पत्रकार विजय गराडे यांनी रुग्नाच्या सोयीसाठी पाच आँक्सीजन वार्ड सिंलेडर प्राथमिक आरोग्य केंद्रास मोफत भरुन दिले.
मांगले येथील प्राथमिक आरोग्य विभागात आँक्सीजन सुविधा उपलब्ध आहे. मांगले सह शेजारच्या बारा गावातील पेंशट उपचारासाठी मांगले येथे येत आहेत. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहेत या पाश्र्वभूमीवर हाँस्पिटल बेड आँक्सीजन मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होत असुन वेळ लागत आहे. अशावेळी रुग्णांना आँक्सीजन मिळाला पाहिजे रुग्णांना बेड व हाँस्पिटल उपलब्ध होईपर्यत आँक्सीजनीची आवश्यकता असल्यास मिळाला पाहिजे अँम्बुलन्समधुन आँक्सीजन लावुन नेता यावा यासाठी पाच वाँर्ड आँक्सीजन सिंलेडर मोफत भरुन देण्यात आले यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळणार आहे.
वाँर्डआँक्सीजन सिंलेडर ची केलेली सोय रुग्णाच्या साठी वरदान ठरणार आहे यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेंद्र घड्याळे, पत्रकार भगवान शेवडे, प्रकाश मोहरेकर, प्रा दिपक तडाखे, पत्रकार अरुण पाटील , ज्ञानदेव शिंदे, राजेंद्र दिवाण, दत्तात्रय तडाखे उपस्थित होते पत्रकार विजय गराडे यांनी राबवलेल्या उपक्रमांचे सर्वत कौतुक होत आहे
Comments
Post a Comment