महाराष्ट्र कुठे होता? महाराष्ट्र कुठे चालला आहे? साठ वर्षांचे ऑडिट कोण करणार?
महाराष्ट्र कुठे होता? महाराष्ट्र कुठे चालला आहे? साठ वर्षांचे ऑडिट कोण करणार?
महाराष्ट्रासाठी लढले कोण? हुतात्मे झाले कोण आणि गब्बर झाले कोण?
मधुकर भावे/उत्तर-दक्षिण
आज ६१ वर्षे झाली.
१ मे १९६० ते १ मे २०२१ .
बघता बघता एका महान लढ्याचा ६१ वर्षांचा काळ कधी संपलाकळलंच नाही. ‘मराठी भाषिक माणूस’ मुंबईसह संयुक्त महाराष्टÑ’ या एकाच मागणीसाठी असा काही एकवटला होता की, या एका विषयापुढे बाकी सगळे विषय झुठ होते, खोटे होते, लहान होते. हा लढा असा होता की, जो-जो संयुक्त महाराष्टÑाच्या लढयाचा, तो-तो महाराष्टÑाचा, अशी एक व्याख्याच तयार झाली होती. कोणी जात पाहिली नाही, कोणी धर्म पाहिला नाही.नेता पाहिला नाही आणि कोणता पक्षही पाहिला नाही. संयुक्त महाराष्टÑ समिती हाच एक नवा पक्ष तयार झाला होता. जो या पक्षाचा उमेदवार, तो आमचा उमेदवार ही महाराष्टÑाची भावना त्या एकाच निवडणुकीत पाहायला मिळाली. जात, धर्म, पैसा गाडून आपल्या बैलगाड्या, आपले छकडे बाहेर काढून, आपल्या दशम्या, आपलाझुणका, आपली शिदोरी बरोबर घेऊन जात-धर्म विसरुन सर्व कार्यकर्ते निवडणुकीला बाहेर पडले. १९५७ ची विधानसभेची महाराष्ट्रातील निवडणूक अशीकाही विलक्षण होती की, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेनंतर पहिल्यांदा मराठी माणसाची अशी एकजूट दिसली. त्यामुळेच मुंबईचे अॅड. बी. सी. कांबळे, दलित समाजाचे नेते अहमदनगर जिल्हा लोकसभा मतदारसंघातून ख्यातनाम अठरे-पाटील यांना पराभूत करून दीड लाख मतांनी लोकसभेवर निवडून आले. मुंबईच्या ताडदेवमधील पारसी कॉलनीत राहणारे नवशेर भरूचा- ज्यांना धड मराठी बोलताही येत नव्हते. ते जळगावातून विधानसभेवर निवडून आले. पश्चिम महाराष्टÑातून कॉंग्रेसचे फक्त सहा उमेदवार विजयी झाले. त्यात एकट्या सातारा जिल्ह्यातून खुद्द मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (कराड), बाळासाहेबदेसाई (पाटण), वसंतदादा पाटील (तासगांव), बॅ.जी.डी.पाटील (मिरज) असे चार दिग्गज नेते एकाच जिल्ह्यातून विजयी झाले. अक्कलकोटहून निर्मलाराजे भोसलेआणि अहमदनगरमधून बाळासाहेब भारदे असे सहा उमेदवार सोडले तर समितीने मिळवलेले यश अपूर्व होते.
त्यावेळच्या सभा, त्यावेळच्या घोषणा, त्यावेळचे लाखालाखाचे मोर्चे प्रतापगडावरचा मोर्चा, दिल्लीच्या संसदेवर धडकलेला मोर्चाआणिअसे तुफानी नेते आता पुन्हा कधी होणार नाहीत. स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, एस.एम. जोशी, कॉ.डांगे, उद्धवराव पाटील, दाजीबादेसाई, एन.डी.पाटील महाराष्ट्र पिंजून काढणाºया या नेत्यांनी महाराष्टÑाच्या जनतेत प्राण फुंकला होता. त्यांच्याच बरोबरीने शाहीर अमर शेख, शाहीर आत्माराम पाटील, अण्णाभाऊसाठे, शाहीर जंगम, शाहीर गजाभाऊ बेणी या शाहीरांनी रान पेटवले होते. असे नेते, असा लढा, अशी निवडणूक आणि महाराष्टÑाची अशी एकजूट कधीच झाली नाही आणि पुन्हा कधी होणारही नाही.
साठ वर्षांनंतर एकसष्ठीत पाऊल ठेवताना हा सगळा लढा, त्या घोषणा, ते नेते, ती जनता, तो संताप, त्या टाळ्या, तेहशे असे एखाद्या चित्रपटासारखे डोळयासमोर जिवंत उभे राहताहेत.
या लढ्यात शेतकरी लढला आणि कामगार लढला. शेतकरºयांच्या आघाडीवर उद्धवराव पाटील, एन.डी. पाटील लढत होते. शहरातल्या सभा एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे गाजवीत होते. कामगारांच्या सभा कॉ.डांगे, जॉर्ज फर्नांडिस यांच्या सभांनी वातावरण दणाणून गेले होते. नागपूरात कॉ. बर्धन, अमरावतीत सुदाम देशमुख आणि संपूर्ण महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सभांनी रान पेटवले होते. पणहासगळा लढा, १०६ लढवय्यांचे हुतात्मा होणे, १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत महाराष्टÑात जेवढे लोक सत्याग्रहात गेले नाहीत, त्याच्या दुप्पट म्हणजे ६३ हजार कार्यकर्ते तुरुंगात गेले. आचार्य अत्रे यांचा अगोदरचा नवयुग आणि नंतरचा मराठा, अप्पा खाडीलकरांचा नवाकाळ, पुण्याच्या वालचंद कोठारी यांचा प्रभात आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे साप्ताहिक प्रबोधन हे चार पत्रकार संयुक्त महाराष्टÑाच्या लढ्याचे खरे पुरस्कर्ते होते.
आज हा सगळा लढा आठवताना एकच प्रश्न मनात येतो की, एखाद्या समरांगणासारखा लढलेला महाराष्टÑ कशासाठी लढला होता? कोणासाठी लढला होता? या लढ्यातील आघाडीवरचा शेतकरी आणि तेवढ्याच आक्रमकपणे आघाडीवर राहिलेला कामगार हे सलग पाच वर्षे कोणासाठी लढले? १०६ हुतात्म्यांचे बलिदान कोणासाठी झाले? संयुक्त महाराष्टÑासाठी लढलेकोण? खस्ता कोणी खाल्या? लाठ्या कोणी खाल्या? हुतात्मे कोण झाले आणि गेल्या ६१ वर्षात गब्बर कोण झाले? सलग पाच वर्षे लढलेला तो शेतकरी, साठ वर्षानंतर आत्महत्या करतो आहे आणि मुंबई, नागपूर , सोलापूर कामगाराचा आवाज बुंलद करणारा आवाज गेल्या ६० वर्षांत उद्धवस्त झाला आहे.गिरणीचा भोंगा बदं झाला आहे. गिरणगाव ओसाड पडले आहे. तिथे ओस्वालांचे टॉवर उभे राहिले आणि त्या इमारतीच्या बुल्डोझर खाली मुंबईतल्या ६५ गिरण्यातला अडीच लाख कामगार चिरडला गेला आहे. अनेक अहवाल आले, अनेक कमिशने बसली, अनेक चौकशा झाल्या, पण या साठ वर्षात मराठी माणूस नेमका कुठे आहे, याची चौकशी कोणी केलीका? व्यापार कोणाच्या हातात राहिला? गरवारे, चौगुले, किरर्लोेस्कर हे मराठी उद्योगपती आज कोणत्या अवस्थेत आहेत? त्यांचे उद्योग रसातळाला का गेले? वीस वर्षापूर्वी ४ हजार रुपयांवर नोकरी करणारे धिरुभाई आणि त्याचा परिवार आज देशात क्रमांक एकच श्रीमंत घराणंहोतं. २०१४ साला मध्ये कोणाला माहित नसलेला अदाणी अब्जावधी रुपयांचा मालक होतो आणि महाराष्टÑासाठी लढलेला शेतकरी आत्महत्या करतोय आणि कामगार चिरडला जातो आहे... तांबे, विरकर आणि सरदार गृहासाठी मराठी उपहार गृहे निकालात निघतात. परळचं भारतमाता, नायगावच हिंदमाताही मराठी टॉकीज उद्धवस्त होतात आणि अंधेरीत मॉल उभे राहतात. ही सगळी भयान अवस्था गेल्या ६० वर्षात का झाली, कशी झाली, कोणामुळे झाली याची चर्चा करायला मराठी माणसाला वेळ नाही, मराठी नेत्यांना वेळ नाही.
त्याही पेक्षाआणखी एक भयानक अशी महाराष्टÑाची वाताहत झालेलीआहे. १९६० ते १९८० या अवघ्या वीस वर्षात या महाराष्टÑात ३१ मोठी धरणे उभीराहिली. त्यात कोयना, जायकवाडी, उजणी, काळ, अप्पर वर्धा, पायनगंगा, कालीसरारा, अरुणावती अशी महाकाय धरणे आहेत. २४० मध्यम धरणे उभी राहिली. त्यात जळगावचे हातनूर, नांदेडचे विष्णूपुरी अशी धरणे आहेत. साडे तीन हजार छोटी धरणे उभी केली गेली. याच वीस वर्षांच्या काळात कोयनेचा जलविद्युत प्रकल्प, कोराडीचा औष्णिक प्रकल्प, चंद्रपूरचा औष्णिक प्रकल्प आणि अकोल्याचा पारसगावचा औष्णिक प्रकल्प असे १५ हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे प्रकल्प आज जे महाराष्टÑात आहेत, ते १९६० ते १९८० या वीस वर्षात उभे राहिलेले आहेत. चारकृषि विद्यापिठे त्याच काळातली. नवी मुंबईची निर्मिती त्याच काळातली. रोजगार हमी त्याच काळातली. कापूस एकाधिकार योजना त्याच काळातली. एक रुपया कर्ज न काढता १९६० ते १९८० ही वीस वर्षे महाराष्टÑ खºया अर्थाने समृद्धीची वाटचाल करत होता. १९८० नंतर २०२१ च्या १ मे पर्यंत ४१ वर्षात एक तरी नवीन धरण झाले का? एक नवीन वीज निर्मिती केंद्र उभे राहिले का? कष्टकºयाला काम देणारी रोजगार हमी योजना मातीत का घातली गेली? कापूस उत्पादक शेजकºयाला हमी भाव देणारी एक चांगली योजना कोणी मोडून, तोडून खाऊन टाकली? अलिकडे हॉस्पिटलला आग लागली तर फायर आॅडीट होते. एसीचा कॉम्प्रेसर फाटला तर एसी आॅडिट होते. शेतकरी आणि कामगारांना जिवनात स्वास्थ देणाऱ्या योजना मोडून तोडून काढल्या, त्याचे आॅडीट कोण करणार? कोणाला फाशी देणार? १ मे १९६० ते 1 मे १९८० पर्यंत एक रुपया डोक्यावर कर्ज नसलेला महाराष्ट्र आज पाच लाख रुपये कर्ज डोक्यावर घेऊन सरकार काम करत आहे. १०० रुपयातील ७३ रुपये पगारावर वाटले जातआहेत. रस्ते चांगले झाले असतील शहरे उजळली असतील, पण गेल्या चाळीस वर्षात ग्रामीण भागात रखरखाट आणि शहरांमध्ये लखलखाट असे चित्र निर्माण झाले आहे. शहरी जीवनमान उंचावले असेल, पण खेडी उद्ध्वस्त का झाली? शेतीसाठी बांधलेल्या किती धरणांचे पाणी शेतीला दिले जाते? ९० टक्के धरणांचे पाणीआता शहरांना पिण्यासाठी पुरवले जाते. सिंचन क्षमता वाढणार कशी? साठ वर्षांपूर्वी म्हण होती, उत्तमशेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी आता नोकरी सर्वश्रेष्ठ झालीआहे. ३६५ दिवसात १८९ सुट्या झाल्या. शिक्षकांपासून सगळ्याचे पगार हजारो रुपयांत झाले. शेती उद्ववस्त झाली. राजकारणात धटींगणपणा आली, मुजोरी आली, पैशांचा प्रचंड वापर आला. राजकारणातील संमजसपणा, सभ्यता, सुसंस्कृतपणा जवळपास मोडीत निघाला आहे. साठ वर्षांनंतर आज एकच प्रश्न मनात येतो की, ६० साली महाराष्टÑ कुठेहोता? २०२१ साली महाराष्ट्र कुठे चालला आहे? याचे उत्तर कोण देणार आहे याचे आॅडिट कोण करणार आहे?
Comments
Post a Comment