मांगलेचा देवदुत डॉक्टर ओकांर पाटील*

*मांगलेचा  देवदुत  डॉक्टर ओकांर  पाटील*
        मांगले :पुण्यनगरी  

श्री राम समर्थ हाँस्पिटल रुग्णांसाठी आरोग्य पंढरी    
कोरोना काळात  स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता जीवाचं रान करून अखंडपणे रुग्ण सेवा देत आहेत ते डॉक्टर त्यापैकी एक  मांगले ता शिराळा येथील डॉक्टर ओकांर  पाटील आहेत श्रीराम समर्थ हाँस्पिटलच्या व शिराळा उप जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी स्वस्तिक हाँस्पिटल शिराळा या  माध्यमातून कोरोना काळात ग्रामीण भागात अहोरात्र रुग्णसेवा सुरू आहे मांगले सारख्या ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेऊन रशिया येथील होल्वोग्रार्ड या नामांकित युनिव्हर्सिटीत MBBS  शिक्षण घेतले व बालरोगतज्ज्ञ हे शिक्षण पुर्ण केले यावेळी कोल्हापूर वारणा  कोडोली या ठिकाणी हाँस्पिटल उभा करुन लाखो रुपये मिळवू शकले असते पण वारणा व मोरणा संगमावरील व  मंगलनाथाच्या छायेखाली असणाऱ्या मला माझ्या गावात  रुग्ण सेवा करायची आहे माझ्या  शिक्षणाचा उपयोग माझ्या गावासह शिराळा तालुक्याला  झाला पाहिजे लहान थोरांचे आरोग्य चांगले रहावे हि  समाजाबद्दल आत्मियता असल्याने कोणताही डामडौल न करता आपले वडील सुरेश पाटील भाऊ व आई नंदा पाटील वहिनी यांच्या हस्ते श्रीराम हाँस्पिटलचा शुभारंभ केला अन् आज हे हाँस्पिटल रुग्णासाठी आरोग्य पंढरी  ठरले आहेत तर डाँक्टर ओकांर पाटील देवदुत ठरले आहेत   
या कोरोना महामारीत मृत्यूच्या जबड्यातून रुग्णांना परत आणतांना काही डॉक्टर्स व त्यांच्या कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील  कोरोनाच्या बाधेने घायाळ होताना दिसतात.
 तरीही न डगमगता धैर्याने आलेल्या परिस्थितीशी झुंज देत अखंडपणे रुग्ण सेवेचा झरा सुरु आहे मांगले  सह शिराळा तालुक्यातील   रुग्ण आरोग्या साठी उपचारासाठी येत आहेत 
   या कोरोनाविरूध लढाईत येथे स्वच्छ व प्रामाणिक हेतूने  कोरोनाविरूध लढाईत पुर्ण ताकतीने डॉक्टर ओकांर  पाटील उतरलेआहेत   कोरोना पासुन काळजी कशी व काय घेतली पाहिजे यासाठी त्यांच्या कडून समाज प्रबोधन व उपचार सुरुच आहे.कोरोनावर वेळीच उपचार घेतल्यास व व्यायाम केल्यास  बरा होतो सकारात्मक विचार केल्यास कोरोनाला मुक्त लवकर व्हाल  आपल्या श्रीराम समर्थ हाँस्पिटलच्या माध्यमातून अविरतपणे  रुग्णांना सेवा देत  आहेत.  दिवसभर व रात्री अपरात्री कोणीही येवुदे अथवा फोन आल्यावर ते घरी जाऊन उपचार करतात तो कोण आहे त्याला काय झालं असाव किंबहुना त्याच्याकडे पैसे आहेत का नाही याचा विचार ही मनात न आणता डॉक्टर ओकांर पाटील थेट प्राथमिक उपचार  करत आहेत त्यांना औषधे उपलब्ध करुन देत आहेत अनेक रुग्णांना स्वखर्चाने उपचार केले आहेत पण आपलेकडे आलेला रुग्णावर  उपचार करण्या
साठी ते प्रयत्नांची शिकस्त करत आहेत कोरोनाची लागण झाले नंतर रुग्णांच्या मनात भिती आहे हाँस्पिटला दाखल होत नाहीत अशा रुग्णांना मानसशास्त्रीय समुपदेशन करत आहेत  लोकांचे मनोधैर्य वाढवत आहेत त्यांच्या सुविद् पत्नी  डॉक्टर स्वाती पाटील त्यांना सहर्काय करत आहेत  .रुग्णांना  मानसिक  आधार  योग्य मार्गदर्शन करत आहेत गोरबरीबांचे प्रेम व आर्शिवाद हि डॉक्टर ओकांर  पाटील यांच्या  कामाला प्रेरणा देत आहेत मांगले सह  शिराळा तालुक्यातील रुग्ण सेवा देण्यात आघाडीवर आहेत     
             *विजय गराडे* पत्रकार पुण्यनगरी

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....