सागावचा देवदूत डॉ दिलीप पाटील
*सागावचा देवदूत डॉ दिलीप पाटील*
जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटकाळात सिमेवरील जवानाप्रमाणे स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता जीवाचं रान करून अहोरात्र झटत आहेत ते डॉक्टर्स.
या महामारीत मृत्यूच्या जबड्यातून रुग्णांना परत आणतांना काही डॉक्टर्स ही या कोरोनाच्या बाधेने घायाळ होताना दिसतात.
तरीही न डगमगता धैर्याने आलेल्या परिस्थितीशी झुंजणारे अनेक योद्धे आहेत. सागाव ता शिराळा येथील डॉक्टर दिलीप पाटील व डॉक्टर जयश्री पाटील होय
या कोरोनाविरूध लढाईत वैद्यकीय क्षेत्रात एख वर्षापासून अहोरात्र रुग्ण सेवा देत आहेत हे काम करताना सागाव येथील डॉक्टर दिलीप पाटील व डॉ जयश्री पाटील कोविड पाँझीटिव आले.
मात्र हे कोविड योध्दे'बचेंगे तो और भी लढेंगे' या उक्तीप्रमाणे
कोरोनाच्या छाताडावर पाय देवून कोरोना विरुध्द लढाईत जिंकले. ग्रामदैवत भैरवनाथाच्या आर्शिवादाने कोरोना मुक्त झाले
पण जो मला व माझ्या कुटुंबातील सर्वांना त्रास झाला तो दुसऱ्या कोणाला होवू नये या स्वच्छ व प्रामाणिक हेतूने पुन्हा कोरोनाविरूध लढाईत पुर्ण ताकतीने डॉक्टर उतरले आपल्याला आलेले अनुभव झालेला त्रास पुढील जीवनात होणारे परिणाम याची माहिती दिली . पण त्याहीपेक्षाजास्त कोरोना पासुन काळजी कशी व काय घेतली पाहिजे यासाठी त्यांच्या कडून समाज प्रबोधन सुरुच आहे.
स्पष्ट बोलल्यावर अनेकदा वाईटपणा घ्यावा लागला. तरीही ते आपल्या हाँस्पिटलच्या माध्यमातून अविरतपणे रुग्णांना सेवा देत आहेत. दिवसभर व रात्री अपरात्री कोणीही येवुदे अथवा फोन आल्यावर ते घरी जाऊन उपचार करतात तो कोण आहे त्याला काय झालं असाव किंबहुना त्याच्याकडे पैसे आहेत का नाही याचा विचार ही मनात न आणता डॉक्टर थेट प्राथमिक उपचार करतात. रिस्क नको म्हणून तपासणी उपचार गावातील रुग्णांना बेड व औषधे इस्लामपूर, कोल्हापूर, कोडोली , कराड, सांगली येथे कुठे सोय करता येईल यासाठी अविरतपणे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.अनेकांना जीवदानाबरोबर मानसिक आधार योग्य मार्गदर्शन करत आहेत गोरबरीबांचे प्रेम व आर्शिवाद हि डॉक्टरांच्या कामाला प्रेरणा देत आहेत *विजय गराडे पत्रकार पुण्यनगरी मांगले* 8805223000
Comments
Post a Comment