दत्तुनानांच्या (आप्पांच्या) आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
काही माणसाचं आयुष्य अल्पावधीचं असत पण त्या अल्पावधी आयुष्यात ही माणसं असामान्य काम करून जात असतात. मांगरूळ गावचे दत्तात्रय गुंडा कुंभार हे त्यापैकीच एक. आपल्या कामातून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. लोकांच्या सुख दुःखात नेहमी सहभागी होत असणाऱ्या दत्तात्रय कुंभार यांनी अवघ्या ७४ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. ते आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नसला तरी नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही. शिराळा तालुक्यातील मांगरूळ गावात कुंभार कुटुंब वास्तव्यास आहे. हुतात्मा धोंडी संतू कुंभार यांचे ते वंशज. तसे या कुटूंबाला पहिल्यापासूनच समाजसेवेचा वारसा. त्यात दत्तुनाना हे सर्वांचे श्रद्धास्थान. कधी कोणाशि भांडण नाही, कधी कोणाला उद्धटपणे बोलने नाही. सरळ अणि शांत स्वभावाचे दत्तुनाना यांच्यावर संपूर्ण गावाचा विश्वास. सुरुवातीपासूनच राजकारणाची आवड असल्याने दत्तुनाना गावच्या ग्रामपंचायतीचे सदस्य होते. त्याच बरोबर त्यांची सुन मनिषा कुंभार ही सुद्धा सरपंच होण्यात दत्तुनानांचा मोठा हात होता. एवढेच नाही तर आपल्या पुतण्याची बायको रंजना कुंभार ...