दत्तुनानांच्या (आप्पांच्या) आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

काही माणसाचं आयुष्य अल्पावधीचं असत पण त्या अल्पावधी आयुष्यात ही माणसं असामान्य काम करून जात असतात. मांगरूळ गावचे दत्तात्रय गुंडा कुंभार हे त्यापैकीच एक. आपल्या कामातून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. लोकांच्या सुख दुःखात नेहमी सहभागी होत असणाऱ्या दत्तात्रय कुंभार यांनी अवघ्या ७४ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.   ते आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नसला तरी नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही. 

शिराळा तालुक्यातील मांगरूळ गावात कुंभार कुटुंब वास्तव्यास आहे. हुतात्मा धोंडी संतू कुंभार यांचे ते वंशज. तसे या कुटूंबाला पहिल्यापासूनच समाजसेवेचा वारसा. त्यात दत्तुनाना हे सर्वांचे श्रद्धास्थान. कधी कोणाशि भांडण नाही, कधी कोणाला उद्धटपणे बोलने नाही. सरळ अणि शांत स्वभावाचे दत्तुनाना यांच्यावर संपूर्ण गावाचा विश्वास.       सुरुवातीपासूनच राजकारणाची आवड असल्याने दत्तुनाना गावच्या ग्रामपंचायतीचे सदस्य होते. त्याच बरोबर त्यांची सुन मनिषा कुंभार ही सुद्धा सरपंच होण्यात दत्तुनानांचा मोठा हात होता. एवढेच नाही तर आपल्या पुतण्याची बायको रंजना कुंभार ही सुद्धा त्यांच्याच प्रयत्नामुळे सरपंच झाली हे संपूर्ण गावाला माहिती आहे. एवढा मोठा विश्वास दत्तुनानांच्यावर गावाचा होता. राजकारणात जरी असले तरी नेहमी सामंज्याची भूमिका घेणारे दत्तूनाना तंटामुक्ती समितीचे सचिव म्हणून काम पाहत होते. गोरगरीब व्यक्तींवर झालेला अन्याय त्यांनी कधीच सहन केला नाही. 
          आम्ही सर्वजण त्यांना आप्पा म्हणत होतो. शुक्रवारी सकाळी आप्पा गेल्याची बातमी समजली आणि पायाखालची जमीनच सरकल्यासारखी वाटली. अतिशय प्रेमळ व शांत असणारे आप्पा आता कधीच दिसणार नाहीत. कुंभारवाड्यातील हा एक आधारवड असणारा वटवृक्ष आज कोसळला त्यामुळे हा कुंभारवाडा भकास झाल्यासारखा दिसतो होता. पांढरा शुभ्र सदरा त्यावर पांढरा लेंगा हाताची घडी घालून कट्यावर बसलेले दत्तुनाना आता मात्र दिसणार नाहीत हे हे मात्र तितकंच खरं आहे. 
   आज आप्पा देहाने जरी  नसले तरी त्यांचे कार्यकर्तुत्व नेहमीच स्मरणात राहील.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांना झालेले दुःख शब्दात व्यक्त करणं केवळ अशक्य आहे. 
दत्तुनानांच्या (आप्पांच्या) आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

 शब्दांकन- मनोज मस्के 
                9890291065

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*