*पै.शाहुराज जयवंतराव पाटील वाढदिवस विशेष*.
*पै.शाहुराज जयवंतराव पाटील वाढदिवस विशेष*.
....................
शिराळा तालुक्यातील मांगले गावचे सुपुत्र *पै. शाहुराज पाटील यांचा आज वाढदिवस*...
.................
शाहुराजचे प्राथमिक शिक्षण मांगले येथे झाले त्यानंतर माध्यमिक शिक्षण शिराळा व उच्च शिक्षण चिखली व वारणानगर येथे पुर्ण झाले . शालेय जिल्हा चाचणी, इंटरनॅशनल झोनल युनिव्हर्सिटी, वारणा कुमार केसरी, सुरूल येथील राज्यस्तरीय सामन्यात पारितोषीक मिळवलेले मांगले गावचे सुपुत्र पैलवान शाहूराज पाटील
शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले पै. शाहु आपला कुस्ती हा खेळ सांभाळत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. कुस्तीतच करिअर करायचं असं शाहू यांनी मनाशी पक्क ठरवलं आहे.
शाहू यांचे वडील जयंतराव आप्पा पाटील हे मांगले गावचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. राजकीय क्षेत्रात सक्रीय असतात .लोकनेते स्वर्गीय फत्तेसिंगराव नाईक आप्पा यांच्यापासून मा. आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांच्यापर्यंत जयवंतराव आप्पांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत सर्वसामान्य जनतेला आपलासा वाटणारा कौटुंबिक आपुलकी जपणारा माणूस म्हणून त्यांची मांगले गावात ओळख आहे.
आपला मुलगा पैलवान असावा त्याच्या मनगटात बळ असावे या हेतूने त्यांनी आपला एकुलता एक मुलगा शाहुराजला पैलवान करण्याचे ठरवले. आधी शिक्षण आणि नंतर पैलवान या हेतूने शाहुराज बीकाँम पर्यंत शिक्षण पुर्ण आहे मांगले गावचे सुप्रसिद्ध पैलवान महेश शेवडे हे शाहू चा सराव घेत. महेश शेवडे यांनी ऑल इंडिया चॅम्पियन युनिव्हर्सिटी असे अनेक स्पर्धेत त्यांनी आपलं नाव लौकिक केलेला आहे.ते कोल्हापूरला असतात पण तेआठवड्यातून दोन वेळा आपल्या गावात येऊन मुलांना प्रशिक्षणही देतात त्यांच्या हाताखाली शाहू सराव करत आहे.
पै शाहू हा अत्यंत शांत व संयमी मनमिळाऊ स्वभावाचा सुसंस्कृत आदर्शवत आहे सध्या रामगिरी महाराज तालीम मांगले येथे सराव करत आहे याला कुस्ती क्षेत्रात आपलं नाव आपल्या वस्ताद चे नाव आपल्या वडिलांचे नाव मोठं करायचं आहे म्हणून तो अहोरात्र मेहनत घेऊन सराव करत आहे त्याचबरोबर मांगले येथे कुस्ती आखाडा सर्व सोयीनियुक्त करण्याचा माणस शाहुराजने व्यक्त केला . आज त्याचा वाढदिवस असल्याने त्याच्याविषयी थोडीफार माहिती असावी म्हणून हा शब्द कुस्ती हेच जीवन च्या माध्यमातून केला आहे शाहूला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
मनोज मस्के
शिराळा तालुका अध्यक्ष
कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य,
९८९०२९१०६५
Comments
Post a Comment