Posts

Showing posts from February, 2026

*“जनशक्ती हरली, पण माणूस हरला नाही…”*

Image
*“जनशक्ती हरली, पण माणूस हरला नाही…”* *मनोजकुमार मस्के, मांगरूळ* नुकत्याच हाती आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांनी मनाला अक्षरशः चटका लावला. कोकरूड जिल्हा परिषद उमेदवार विनोद पन्हाळकर आणि पंचायत समितीचे उमेदवार प्रमोद पाटील — सामान्य कुटुंबातून आलेली ही दोन नावं आज आकड्यांत हरली असली, तरी लोकांच्या हृदयात त्यांनी अढळ जागा निर्माण केली आहे. ही केवळ निवडणूक नव्हती. हा दोन गरीब घरांत जन्मलेल्या पोरांचा स्वाभिमानाचा संघर्ष होता. गेले कित्येक दिवस पायाला भिंगरी बांधून, अंगातला जीव रानात घालून, कधी अन्नाचा कणही न खाता त्यांनी रात्रंदिवस एक केलं. गावागावांत फिरून, माणसांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांनी मत नव्हे तर विश्वास मागितला. विकासाच्या गप्पा नव्हत्या, तर वेदनांची भाषा होती. आणि तरीही… निकाल वेगळाच लागला. आज खरंच असं वाटतं — धनशक्तीपुढे जनशक्ती हरली. राजकीय वारसा आणि साठवून ठेवलेला पैसा यांच्या भिंतीपलीकडे सामान्य माणसाची किंमत किती नगण्य आहे, हे या निकालांनी पुन्हा एकदा ठसठशीतपणे दाखवून दिलं. जनता कितीही ठरवो, पण सत्तेच्या आणि पैशाच्या पुढे गरिबाला विचारणार तर...

*“संघर्षातून घडलेला अभिमानाचा वारसा”*

Image
*“संघर्षातून घडलेला अभिमानाचा वारसा”* मांगरूळ गावचा आधारवड, कष्टांची मूर्ती, संघर्षाचा जिवंत इतिहास असलेले *ज्ञानदेव रामचंद्र मस्के* — सर्वांचे लाडके *डी. आर. मस्के आप्पा*, शुक्रवार दि. 06/02/ 2026 रोजी, अल्पशा आजाराने आपल्यातून कायमचे निघून गेले. वय वर्षे 65. त्यांच्या जाण्याने मांगरूळ गावचं नव्हे तर एका संपूर्ण संघर्षयात्रेचं पान बंद झालं. उंचीने थोडेसे ठेंगणे असले तरी विचारांनी, बुद्धीने आणि जिद्दीने ते डोंगराएवढे होते. शिक्षण फारसं झालं नव्हतं, पण अनुभव, अभ्यास आणि व्यवहारज्ञान इतकं प्रखर होतं की मोठमोठ्या शिकलेल्या अधिकाऱ्यांनाही लाजवेल असं त्यांचं बोलणं असायचं. आयुष्याची सुरुवात गिरणी कामगार म्हणून झाली. मेहनत केली, घाम गाळला… पण संपाच्या आंदोलनात नोकरी गेली. त्या क्षणी अनेकजण खचले असते, पण *डी. आर. आप्पा कधीच हार मानणाऱ्यातले नव्हते*. नोकरी गेल्यावर ते गावी परतले. वडिलोपार्जित शेती कसू लागले. गरिबी होती, अडचणी होत्या, पण घरात परमेश्वराने दोन लक्ष्मी दिल्या — दोन मुली. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी, आई-वडील, पत्नी… सगळ्यांचं ओझं एकट्या डी. आर. आप्पांच्या खांद्यावर होतं...