शिवाजी ज्ञानू सपकाळ (तात्या
*भावपूर्ण श्रद्धांजली* *शिवाजी ज्ञानू सपकाळ (तात्या)* (वय ८३) *निधन: दिनांक २८ ऑगस्ट २०२५, सायं. ६.३० वा*. तात्या गेले. हे शब्द लिहताना मन सुन्न होतंय. कारण तात्या हे फक्त एका कुटुंबाचे नव्हते, ते संपूर्ण गावाचे होते – हसरे, खेळकर, सगळ्यांना आपलेसे करणारे. रिळे गावातील शिवाजी ज्ञानू सपकाळ, म्हणजेच सर्वांच्या लाडक्या तात्यांचं आज सायंकाळी अचानक झोपेतच निधन झालं. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला, पण मागे एक मोठा आणि प्रेमळ परिवार ठेवून गेले – पत्नी तानुबाई, मुलगा संजय, मुली सुनिता व स्मिता, सून, नातवंडं, जावई, लेकींची मुलं, आणि असंख्य आप्तस्वकीय, गावकरी व मित्र. तात्यांचा जीवनप्रवास संघर्षमय, पण प्रेरणादायी होता. मुंबईत गिरणी कामगार म्हणून तब्बल ३० वर्ष प्रामाणिकपणे काम करून कुटुंब उभं केलं. मोठ्या मुलीचं लग्न करून, त्यांनी गावाकडे परत येऊन शेतीची जबाबदारी घेतली. कष्ट, निष्ठा आणि समाधान यांनी त्यांच्या आयुष्याची ओळख निर्माण झाली. ते नेहमी चेहऱ्यावर हसू असलेले, लहान मुलांसारखे मनाचे. गेली ३ वर्ष अंथरुणावर होते, अधूनमधून वाकराच्या आधाराने थोडं चाला...