श्रावणीच्या वाढदिवसाला आई-वडिलांकडून एक भावनिक शुभाशिर्वाद
💐 *श्रावणीच्या वाढदिवसाला आई-वडिलांकडून एक भावनिक शुभाशिर्वाद* 💐
*२१ ऑगस्ट — आमच्या आयुष्यातला एक अनमोल दिवस.
आज आमच्या लेकीचा वाढदिवस*!
श्रावणी तू आमच्या आयुष्यात आलीस आणि सगळं जगणंच बदलून गेलं.
तुझ्या आगमनाने घरात एक वेगळंच चैतन्य, एक निरागस हास्य आणि अपार प्रेम नांवलं.
आई-वडील म्हणून तुला खूप काही द्यायचं होतं…
तुझे लाड करायचे होते, हट्ट पूर्ण करायचे होते —
पण परिस्थितीने अनेकदा हात आखडता घेतला.
तरी तू कधीच तक्रार केली नाहीस,
कधी हट्ट धरला नाहीस,
कधी कुणावर राग व्यक्त केला नाहीस.
आई-वडिलांचे आणि चुलत्यांचं प्रत्येक शब्द तू पाळलास,
त्यांची आज्ञा, त्यांचं प्रेम, आणि त्यांची माणसं —
तू हृदयात जपलीस.
तू धार्मिक आहेस, शिस्तबद्ध आहेस,
शाळेच्या अभ्यासात मन लावून शिकतेस,
घरातल्या प्रत्येकाची काळजी घेतेस —
हे सगळं पाहून आम्हा आई-वडिलांना खूप अभिमान वाटतो.
तू आमच्या तिन्ही भावांमध्ये एकटी मुलगी — म्हणूनच अधिकच लाडकी.
पण लाडकी असूनही कधी उर्मटपणा केला नाहीस,
कधी कोणाला दुखावलं नाहीस.
माणसं, संस्कार, देवधर्म — सगळं तू समजून घेतलं, स्वीकारलं.
कधी तुला आपल्या कडून फारसं देता आलं नाही,
पण तुझ्या चुलत्यांनी मात्र तुला नेहमी आपलं समजून घेतलं,
त्यांच्या घरात तुझ्यासाठी माया कमी पडली नाही.
तुला प्रत्येकाच्या आठवणी असतात —
प्रत्येकाच्या वाढदिवशी तू मनापासून शुभेच्छा देतेस,
पण तुझा वाढदिवस मात्र अनेकदा आमच्याकडूनच विसरला जातो —
तरी तू नाराज होत नाहीस… समजून घेतेस,
हेच तुझं मोठेपण.
आज तुझ्या वाढदिवशी आम्ही दोघं — आई आणि बाबा — एकच प्रार्थना करतो:
देवा, आमच्या लेकीचं आयुष्य आरोग्यदायी, आनंदमय, आणि ऐश्वर्यपूर्ण होवो.
ती नेहमी हसत राहो, सुखी राहो, आणि जीवनात भरभराटीच्या वाटेवर यशस्वीपणे वाटचाल करत राहो.
श्रावणी, तू आमच्या आयुष्याची शान आहेस.
तुझ्या प्रत्येक पावलात आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे —
कारण तू आमचं स्वप्न जगतेयस.
🎂💖 *आई-वडिलांकडून तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!* 💖🎂
*देव तुला सर्व सुख, समाधान आणि यश देवो — हीच खरी भेट तुझ्या वाढदिवशी*.
Comments
Post a Comment