‘आपसे भी खूबसूरत आपके अंदाज़ हैं’ - मधुकर भावे उद्या निवडणुकीचा निकाल. उद्या संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. आज सकाळी शरद पवारसाहेबांना भेटून आलो. अक्षरश: ‘सॅलूट’ केला. निवडणुकीत त्यांनी केलेली मेहनत, रणरणत्या उन्हातील प्रचारसभा, निवडणूक प्रचारदौरा, अख्खा महाराष्ट्र तालुका पातळीपासून त्यांनी पिंजून काढला. केवढी प्रचंड इच्छाशक्ती त्यांना कुठेही अडचणीची झाली नाही. ‘त्यांचे वय झाले आहे,’ असे सांगून जे त्यांच्यापासून फुटले होते, त्यांचीही दमछाक झाली. पवारसाहेब आज ताजेतवाने असल्यासारखे आहेत. िकती आत्मविश्वासाने बोलत होते.... ‘उद्या निवडणूक निकाल.... चार दिवसांनंतर काय होतेय ते बघा...’ त्यांना सूचवायचे होते की, जे फुटलेत त्यांची कशी ‘पळापळ’ होईल ते पहा. देशातील अंदाज काहीही असोत... महाराष्ट्रातील संपूर्ण वातावरण हे या महाराष्ट्रातील सरकारविरोधात, मोदींविरोधात, भाजपाविरोधात होते आणि आहे. दादा आणि शिंदे यांच्या विरोधातही आहे. असाच सगळ्यांचा चर्चेचा रोख आहे. पवारसाहेब यांची भेट घेवून बाहेर पडलो... तेव्हा विदर्भातील मंगळूरपीरचे माजी आमदार अनंतकुमार पाटील भेटल...