नागेवाडीचा पै. सुरज निकम याची आत्महत्याकुस्ती क्षेञासह खानापूर तालुक्यात पसरली शोकक

नागेवाडीचा पै. सुरज निकम याची आत्महत्या

कुस्ती क्षेञासह खानापूर तालुक्यात पसरली शोकक
खानापूर तालुक्यातील नागनाथनगर नागेवाडी येथील  नामवंत पैलवान सुरज निकम (वय ३०)  याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकाराने कुस्ती क्षेत्रासह खानापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

पै. सुरज निकम हा नामवंत मल्ल आहे. त्याने यापूर्वी कुस्ती क्षेञातील अनेक किताब पटाकविले आहेत. विरोधी पैलवानाला कोणत्या डावावर चितपट करायचे यात त्याचा हातखंडा होता. त्याने अल्पावधीतच आपला कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण करत कुमार केसरी होण्याचा बहुमान मिळवलेला आहे. कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्लाना  त्याने आस्मान दाखवले आहे. परंतू आज त्याने राहत्या घरी गळफास घेवून आपले जीवन संपविले. त्याच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर तो व्यथित होता. 

शुक्रुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले. निधनाचे वृत्त समजताच कुस्ती क्षेञासह सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे. निधनानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. उद्या दुपारी त्याचे बंधू आल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते. माञ पै. सुरज याने आत्महत्या केली याबाबत पोलिस तपास करत असून त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*