*माळेवाडीतील चार बालकांची अखेर शासनाने घेतली दखल संजय गांधी योजनेचे पेन्शन मंजुरीचे पत्र …..ग्रामस्थातुन समाधान*
*माळेवाडीतील चार बालकांची अखेर शासनाने घेतली दखल
संजय गांधी योजनेचे पेन्शन मंजुरीचे पत्र …..ग्रामस्थातुन समाधान*
*मनोजकुमार मस्के*, मांगरूळ
माळेवाडी-कोकरूड ता.शिराळा येथील निराधार बनलेल्या सुर्वणा दिंडे, विद्या दिंडे, प्रसाद दिंडे ,अर्थव दिंडे या अनाथ चारही मुलांना संजय गांधी निराधार योजनेतुन अनाथ बालक अंतर्गत पेन्शन मंजुर केली असून त्याचे मंजुरीचे पत्र शिराळ्याच्या तहसिलदार शामल खोत पाटील व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केदार नलावडे यांच्या हस्ते घरी नेऊन देण्यात आले संजय गांधी निराधार योजनेतील अनाथ बालक योजनेमधुन चारही बालकांना पेन्शन मंजूर करण्यात आली आहे प्रति महिना 1500 रुपये चारही बालकांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होणार आहेत तहसिलदार शामल खोत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केदार नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार योजनेचे काम आदर्शवत सुरू आहे. यावेळी शासन दरबारी या मुलांच्या शालेय साठी लागणारी सर्व डॉक्युमेंट आम्ही त्यांना उपलब्ध नुसार काढण्यास मदत करू व त्यांचा आधार बनवून त्यांच्या पाठीशी नेहमीच शासकीय कर्मचारी असतील असा मुलांना आधार देत तहसीलदार शामला खोत यांनी उपस्थितांसमोर सांगितले. याआधी या मुलांच्या आजीला सुद्धा आम्ही योग्य ती मदत केली होती त्या माझ्या चांगल्या परिचयाच्या होत्या असेही तहसीलदार खोत यांनी सांगितले. तुम्ही शिकून चांगली प्रगती करा चांगलं वागाव असाही प्रेमाचा सल्ला त्यांनी या चारही बालकांना दिला. यापुढे ज्या ज्या वेळी शासन स्तरावर काही मदत लागल्यास नेहमीच शासन प्रशासन तुमच्या सोबत असेल असाही विश्वास त्यांनी दिला.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य विजय गराडे पाटील ,माळेवाडीच्या सरपंच सागर चाळके, सौरभ नलावडे,सर्कल सुरेश शेळके ,तलाठी उमेश सावंत ,ग्रामसेवक हिंदुराव पाटील ,अक्षय दिंडे ,विष्णु दिंडे ,गणेश दिंडे ,तानाजी जाधव , पोपट दिंडे ,गुंगा जाधव ,गजानन देसख यांच्या सह ग्रामस्थ महिला उपस्थित होते
Comments
Post a Comment