*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*
*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*
*अनाथ मुलांची बातमी पुण्यनगरीने छापताच अनेक मदत करणारे हात पुढे आले*.
मनोजकुमार मस्के -
शनिवारी माळेवाडी येथील अनाथ मुलांची बातमी दैनिक पुण्यनगरीने छापली आणि अक्षरशः दिवसभर मदतीसाठी अनेकांचे फोन येऊ लागले. या गरीब मुलांना मदत करण्यासंदर्भात अनेक लोक घरी येऊन मदत करू लागली. अनाथ मुलांची बातमी संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली आई-वडील आजी-आजोबा कोणी नाहीत. पूर्णपणे अनाथ असणारे या मुलांना अनेक जण मायेचा उभारा देत होती. अनेकजन भेटवस्तू वह्या पुस्तक बरच काही मुलांना आणून देत होते. काहींनी शाळेचा खर्च उचलला काहींनी फोन पे, गुगल पे करून आपली मदत केली. परंतु प्रत्येक फोन हा रडक्या आणि दबक्या आवाजात येत होता. प्रत्येकाला ही कथा वाचून गहिवरून येत होतं. समाजातील माणुसकीची जाण असणारे अनेक हात या मुलांना मदत करत होते. पुण्यनगरीने दखल घेऊन ही बातमी अनेकांच्या पर्यंत पोहोचवली आणि अनेकांनी माणुसकीचे नाते जपत या मुलांना मदतीचा हात पुढे केला. अनेक नाती जागी झाली या लेकरांची विचारपूस करू लागली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन वाजू लागले. आणि निराश झालेल्या मुलांना आपलं कोणीतरी असल्याची जाणीव झाली.
*स्वामी धामने मुलांचे पालकत्व स्वीकारले*
दैनिक पुण्यनगरी ची बातमी वाचली आणि मनोज मस्के पत्रकार यांना लगेच फोन केला मुलांना घेऊन स्वामी धाम अंतरी बुद्रुक येथे येण्याचे सांगितले आणि स्वामी धाम अंत्री बुद्रुक यांच्यामार्फत या मुलांचे पालकत्व आम्ही स्वीकारतो असे जाहीर केले. आज पासून या मुलांचे पालकत्व स्वामीधाम करेल. यापुढे त्यांना लागणारी प्रत्येक गोष्ट ही स्वामीधामार्फत पुरवली जाईल. विशेष म्हणजे या चार मुलांपैकी तीन नंबरचा प्रसाद याचा शनिवारी वाढदिवस होता तो स्वामी धामच्या वतीने बनवण्यात आला.
- शिवाजी रसाळ स्वामी धामचे गुरुवर्य
*समाजाशी नाळ जोडलेलं दैनिक पुण्यनगरी व वारणा एक्सप्रेस*
वारणा एक्सप्रेस न्युज व दैनिक पुण्यनगरीने दखल घेतली नसती तर ही गोष्ट कधीच समाजापुढे येऊ शकली नसती. आणि या मुलांना त्यांचं हसू आम्ही देऊ शकलो नसतो. खऱ्या अर्थानं दैनिक पुण्यनगरी आणी वारणा एक्सप्रेस युट्युब चॅनेल यांनी सर्व गोष्टींची दखल घेत या मुलांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले ते आमच्यासाठी खूप मोलाचे आहे. अन्यथा आम्ही या परिस्थितीत काहीच करू शकलो नसतो. मी पुन्हा एकदा दैनिक पुण्यनगरी चे व वारणा एक्सप्रेस चे मनोज मस्के यांचे आभार मानतो.
- आकाराम खांडेकर (मामा)
Comments
Post a Comment