Posts

Showing posts from January, 2024

म्हासुर्ली येथील विद्यमान महिला सरपंच उपसरपंच अपात्र! जिल्हाधिकारी यांचा आदेश, गावच्या इतिहासात पहिलीच वेळ

Image
म्हासुर्ली येथील विद्यमान महिला सरपंच उपसरपंच अपात्र! जिल्हाधिकारी यांचा आदेश, गावच्या इतिहासात पहिलीच वेळ धामणी खोऱ्यातील म्हासुर्ली (ता.राधानगरी) गावच्या विद्यमान सरपंच मीनाताई भीमराव कांबळे यांना मासिक सभा न घेतल्याच्या कारणावरुन तर उपसरपंच शबाना नौशाद मुलाणी यांना ग्रामपंचायतीच्या सेवेत आर्थिक हितसंबंध जोपासल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अपात्र केले आहे. याबाबतची तक्रार माजी ग्रामपंचायत सदस्य बाबुराव कांबळे यांनी केली होती. एकाच वेळी दोन्ही पदे अपात्र होण्याची ही गावच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. म्हासुर्ली सह इतर वाड्यावस्त्या मिळून ग्रुप ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. सदर ग्रामपंचायतची तीन वर्षांपूर्वी पंचवार्षिक निवडणूक होऊन एकाच गटाचे सर्व अकरा सदस्य निवडून आले होते.मात्र सुरुवातीपासूनच त्यांच्यात किरकोळ गोष्टीवरून कुरबुरी सुरू झाल्याने सदस्यांत दोन गट पडले. त्यातूनच एकमेकावर तक्रारी सुरू झाल्या होत्या. परिणामी गतवर्षी गायरान जमिनीमध्ये अतिक्रमण केल्याची तक्रारीच्याकारणा वरुन तात्कालीन ग्रामपंचायत सदस्य बाबुराव कांबळे अपात्र झाले होते. तर ...

कै. आत्माराम पाटील (दादा) यांना भावपूर्ण श्रद्धांजली*

Image
*कै. आत्माराम पाटील (दादा) यांना भावपूर्ण श्रद्धांजली* *शांत, संयमी आणि प्रामाणिकपणाने आपले आयुष्य जगत असताना अचानक मृत्यूने घाला घालावा आणि चालता बोलता एखादा माणूस आपल्यातून सहज हिरावून घ्यावा असंच काहीस आत्माराम तुकाराम पाटील (दादा) यांच्या बाबतीत घडलं सहज चालता बोलता ते आमच्यातून निघून गेले. मनाला खूप वाईट वाटलं. खरं तर चार दिवसांपूर्वीच दादा गावाला येऊन गेले होते. बरेच वेळा त्यांची आणि माझी भेट व्हायची. यावर्षी नवरात्रीमध्ये  दादा  आमच्या सोबत फळे आणण्यासाठी आले होते. एवढेच काय तर अतिशय उत्साहाने ते आमच्या ग्रुपशी जोडले गेले होते. संपूर्ण नऊ दिवस  उपवास करून अनेक लोकांना स्वतःच्या हाताने त्यांनी फराळ वाटप केला. यापुढेही आपण असंच चांगलं कार्य करत राहू असं दादांनी आम्हाला सल्लाही दिला. चिंचेश्वर मंदिराच्या बाजूला जे बाथरूम बांधले आहे त्या बाथरूम साठी सुद्धा दादांनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली होती. आपल्या गावात अनेक गैरसोयी आहेत त्या ठिकाणी आपण सोयी करून द्यायच्या हा दादांचा मुख्य हेतू होता. सरकारी सुविधा आपल्या गावात येतील किंवा न येतील परंतु आपल्याला जे श...

डोपिंगच्या विळख्यात पैलवान अडकतोय....

Image
*डोपिंगच्या विळख्यात पैलवान अडकतोय*.... *मनोजकुमार मस्के- मांगरूळ*  9890291065         आज बारकाईने पाहिलं तर महाराष्ट्र केसरीची स्पर्धा संपल्यानंतर त्या स्पर्धेच्या ठिकाणी सिरींज व इंजेक्शन चा खच पडलेला असतो. हा पडलेला खच सर्वसामान्यांच्या बरोबरच आयोजकांनाही दिसत असतो. मग का दुर्लक्ष केलं जातं ? का दिसत असून आंधळ्याचं सोंग घेतलं जातं? कुस्ती परिषदेचे अध्यक्ष यांच्याही कानापर्यंत या गोष्टी गेलेल्या आहेत. सरचिटणीस  यांनी अनेक दैनिकातून किंबहुना साक्षात पाहिलेलं आहे. अनेक वेळा या स्पर्धेला मुख्यमंत्री सुद्धा हजेरी लावतात मग एवढी सगळी यंत्रणा असताना देखील या स्पर्धेत उत्तेजक द्रव्य घेतली जातात ती का थांबवता आली नाहीत? किंवा त्याच्यावरती उपाययोजना का करण्यात आली नाही?. असा महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला प्रश्न आहे?.    खरं पाहता ठराविक गटातील खेळाडू हे आधीपासूनच स्टेरॉईड करत होते इथपर्यंत ठीक आहे, परंतु आता  सर्रास वजनी गटात सुद्धा उत्तेजक द्रव्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्याचं अनेक जाणकारांनी बोलून दाखवले आहे. एवढंच काय तर खेडोप...

*संघटनेतील खुर्ची साठी खेळाडूंचे भविष्य टांगणीवर*....?मनोजकुमार मस्के :-

Image
*संघटनेतील खुर्ची साठी खेळाडूंचे भविष्य टांगणीवर*....? मनोजकुमार मस्के :- मनोजकुमार मस्के  9890291065 गेले बरेच दिवस झाले महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेत फार मोठे रणकंदन चालू असलेचे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. परंतु खरे पाहता यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील तमाम खेळाडूंचे नुकसान आहे. पदासाठी आणि शासनाचे चार पैसे कसे हडप करता येतील यासाठी या कुस्ती परिषद व कुस्ती संघ नावाचं वादळ सध्या महाराष्ट्रात गाजताना दिसत आहे.  पवारांची परिषद काहींच्या मते स्वच्छ काम करत नाही? हे जरी खरे असले तरी रामदास तडसांचा कुस्ती संघ सुद्धा उत्कृष्ट काम करेल असा विश्वास तमाम महाराष्ट्रातील पैलवानांना ठाम नाही. खरं पाहता वर्षानुवर्ष जागा अडवून ठेवणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी जागा खाली करून नवीन लोकांना संधी देणे गरजेचे असताना निव्वळ पदासाठी आणि प्रतिष्ठेसाठी खिळे ठोकल्यासारखे खुर्चीसी चिकटून बसणे हे जसे धोक्याचे आहे तसेच ब्रुजभूषन यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रात लक्ष घालने हे ही धोक्याचे आहे. आज महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करणाऱ्या ब्रुजभूष...

*शिराळा तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी शिवाजीराव चौगुले तर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी प्रीतम निकम यांची निवड*

Image
शिराळा : *शिराळा तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी  शिवाजीराव चौगुले  तर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी प्रीतम निकम यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना मावळते अध्यक्ष संजय घोडे-पाटील,मनोज मस्के व इतर*   शिराळा,ता.४  : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्न असणाऱ्या शिराळा तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी दै. सकाळचे तालुका  प्रतिनिधी शिवाजीराव चौगुले  तर  कार्याध्यक्षपदी  दै.हॅलो प्रभातचे नारायण घोडे  आणि  पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी दै.तरुण भारतचे प्रीतम निकम तर कार्याध्यक्षपदी दै.प्रभातचे  रवी यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली . शिराळा येथील संत गाडगे महाराज सांस्कृतिक सभागृहात झालेल्या मराठी पत्रकार संघटनेच्या बैठकीत सन २०२४-२५  या सालाकरिता कार्यकारिणीच्या बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या. सेवानिवृत्त माहिती अधिकारी हंबीरराव देशमुख, मावळते अध्यक्ष संजय घोडे,मनोज मस्के,संतोष बांदिवडेकर  यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत...