कै. आत्माराम पाटील (दादा) यांना भावपूर्ण श्रद्धांजली*

*कै. आत्माराम पाटील (दादा) यांना भावपूर्ण श्रद्धांजली*
*शांत, संयमी आणि प्रामाणिकपणाने आपले आयुष्य जगत असताना अचानक मृत्यूने घाला घालावा आणि चालता बोलता एखादा माणूस आपल्यातून सहज हिरावून घ्यावा असंच काहीस आत्माराम तुकाराम पाटील (दादा) यांच्या बाबतीत घडलं सहज चालता बोलता ते आमच्यातून निघून गेले. मनाला खूप वाईट वाटलं. खरं तर चार दिवसांपूर्वीच दादा गावाला येऊन गेले होते. बरेच वेळा त्यांची आणि माझी भेट व्हायची. यावर्षी नवरात्रीमध्ये  दादा  आमच्या सोबत फळे आणण्यासाठी आले होते. एवढेच काय तर अतिशय उत्साहाने ते आमच्या ग्रुपशी जोडले गेले होते. संपूर्ण नऊ दिवस  उपवास करून अनेक लोकांना स्वतःच्या हाताने त्यांनी फराळ वाटप केला. यापुढेही आपण असंच चांगलं कार्य करत राहू असं दादांनी आम्हाला सल्लाही दिला. चिंचेश्वर मंदिराच्या बाजूला जे बाथरूम बांधले आहे त्या बाथरूम साठी सुद्धा दादांनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली होती. आपल्या गावात अनेक गैरसोयी आहेत त्या ठिकाणी आपण सोयी करून द्यायच्या हा दादांचा मुख्य हेतू होता. सरकारी सुविधा आपल्या गावात येतील किंवा न येतील परंतु आपल्याला जे शक्य आहे ते आपण करत राहायचं असं नेहमी दादांचा आम्हाला सल्ला असे. 2023 चा नवरात्र उत्सव दादांनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन फराळ वाटप केला.  नेहमी हसतमुख असणारे दादा ,  प्रत्येकाशी प्रेमाने बोलणारे दादा, समाजप्रती काहीतरी करण्याची इच्छा असणारे दादा, अनेकांशी मैत्री टिकवलेले दादा आज अचानक आपल्यातून निघून गेलेत हे दुःख विसरणे फार कठीण आहे.
 दादा एवढे दानशूर होते की त्यांनी आपल्या शरीराचा एक भाग सुद्धा आपल्या मुलीला भेट दिला. जगात बाप अशी एकमेव व्यक्ति आहे ती आपल्यावर बिनशर्त प्रेम करते. तो कधीच आपल्याकडून त्याचे मोल मागत नाही. अपत्यासाठी वेळेप्रसंगी जीवही देण्याची तयारी ठेवतो.  बापाने किडनी देऊन आपल्या विवाहित मुलीला जीवनदान दिले. असा दानशूर बाप त्या मुलांना, असा विश्वासू पती त्या पत्नीला, आणि असा समाजासाठी प्रेम असणारा आपला जवळचा माणूस संपूर्ण गावाला सोडून गेला याचे दुःख कुटुंबासह संपूर्ण मांगरूळ गावाला आहे. ही व्यक्ती सहजासहजी विसरता येणे कठीण आहे. दादांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो भावपूर्ण श्रद्धांजली*

मनोज मस्के -

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*