म्हासुर्ली येथील विद्यमान महिला सरपंच उपसरपंच अपात्र! जिल्हाधिकारी यांचा आदेश, गावच्या इतिहासात पहिलीच वेळ

म्हासुर्ली येथील विद्यमान महिला सरपंच उपसरपंच अपात्र! जिल्हाधिकारी यांचा आदेश, गावच्या इतिहासात पहिलीच वेळ


धामणी खोऱ्यातील म्हासुर्ली (ता.राधानगरी) गावच्या विद्यमान सरपंच मीनाताई भीमराव कांबळे यांना मासिक सभा न घेतल्याच्या कारणावरुन तर उपसरपंच शबाना नौशाद मुलाणी यांना ग्रामपंचायतीच्या सेवेत आर्थिक हितसंबंध जोपासल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अपात्र केले आहे. याबाबतची तक्रार माजी ग्रामपंचायत सदस्य बाबुराव कांबळे यांनी केली होती. एकाच वेळी दोन्ही पदे अपात्र होण्याची ही गावच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.


म्हासुर्ली सह इतर वाड्यावस्त्या मिळून ग्रुप ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. सदर ग्रामपंचायतची तीन वर्षांपूर्वी पंचवार्षिक निवडणूक होऊन एकाच गटाचे सर्व अकरा सदस्य निवडून आले होते.मात्र सुरुवातीपासूनच त्यांच्यात किरकोळ गोष्टीवरून कुरबुरी सुरू झाल्याने सदस्यांत दोन गट पडले. त्यातूनच एकमेकावर तक्रारी सुरू झाल्या होत्या.

परिणामी गतवर्षी गायरान जमिनीमध्ये अतिक्रमण केल्याची तक्रारीच्याकारणा वरुन तात्कालीन ग्रामपंचायत सदस्य बाबुराव कांबळे अपात्र झाले होते.

तर विद्यामान सरपंच सौ मीनाताई कांबळे यांनी एप्रिल २०२१ ची मासिक सभा न घेतल्याने कर्तव्यात कसूर केल्याची तर उपसरपंच शबाना मुल्लाणी यांचे पती नौशाद मुलाणी यांनी गाडीच्या भाड्यापोटी ग्रामपंचायती कडून रक्कम स्वीकारल्याने आर्थिक हित संबंध जोपासून आर्थिक लाभ प्राप्त केल्यामुळे त्यांना अपात्र करावे अशी मागणी माजी सदस्य बाबूराव कांबळे यांनी अर्जव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती . या प्रकाराची सखोल चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच व उपसरपंच यांना अपात्र केले असून मीनाताई कांबळे सरपंचपदी अपात्र तर शबाना मुलाणी यांना उपसरपंच पदासह ग्राम पंचायत सदस्य पदावरून अपात्र ठरविण्यात निर्णय दिला आहे

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*