डोपिंगच्या विळख्यात पैलवान अडकतोय....

*डोपिंगच्या विळख्यात पैलवान अडकतोय*....
*मनोजकुमार मस्के- मांगरूळ*  9890291065

        आज बारकाईने पाहिलं तर महाराष्ट्र केसरीची स्पर्धा संपल्यानंतर त्या स्पर्धेच्या ठिकाणी सिरींज व इंजेक्शन चा खच पडलेला असतो. हा पडलेला खच सर्वसामान्यांच्या बरोबरच आयोजकांनाही दिसत असतो. मग का दुर्लक्ष केलं जातं ? का दिसत असून आंधळ्याचं सोंग घेतलं जातं? कुस्ती परिषदेचे अध्यक्ष यांच्याही कानापर्यंत या गोष्टी गेलेल्या आहेत. सरचिटणीस  यांनी अनेक दैनिकातून किंबहुना साक्षात पाहिलेलं आहे. अनेक वेळा या स्पर्धेला मुख्यमंत्री सुद्धा हजेरी लावतात मग एवढी सगळी यंत्रणा असताना देखील या स्पर्धेत उत्तेजक द्रव्य घेतली जातात ती का थांबवता आली नाहीत? किंवा त्याच्यावरती उपाययोजना का करण्यात आली नाही?. असा महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला प्रश्न आहे?.
   खरं पाहता ठराविक गटातील खेळाडू हे आधीपासूनच स्टेरॉईड करत होते इथपर्यंत ठीक आहे, परंतु आता  सर्रास वजनी गटात सुद्धा उत्तेजक द्रव्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्याचं अनेक जाणकारांनी बोलून दाखवले आहे. एवढंच काय तर खेडोपाडी होणाऱ्या मैदानात सुद्धा आज उत्तेजक द्रव्य पोहचलेलं प्रामुख्याने दिसत आहे. या सर्व यंत्रणेला कारणीभूत कोण?.  का महाराष्ट्रातील खेळाडूंच्या जीवाशी खेळले जातंय?. कोण आहे याच्या मागचा सूत्रधार? का डोपींगची लागण लावली आहे  खेळाडूंना?.  पैसे आणी प्रतिष्ठा कमावण्याच्या नादात नको ते उत्तेजक द्रव्य शरीरात घेणे ही अतिशय घृणास्पद गोष्ट आहे . मला वाटतं आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये कडक नियम आहेतच. आपण आपल्या राज्यात खेळाडूंसाठी कडक निर्बंध लावणं गरजेचं आहे. तरच येणाऱ्या काळात पैलवान डोपिंग पासून दूर होईल. अन्यथा डोपिंगच्या विळख्या अडकलेला पैलवान बाहेर काढता काढता आपणा सर्वांच्या नाकी नऊ येईल.
        जागतिक स्तरावर उत्तेजक पदार्थांचे सेवन करण्यावर प्रतिबंध लावण्यासाठी 1999 मध्ये (वाडाची) स्थापना केली त्यानंतर प्रत्येक देशात (नाडाची) स्थापना करण्यात आली. या संस्थेकडे डोपिंग मध्ये दोशी आढळलेल्या खेळाडूंवर कारवाई करण्याचे अधिकार देखील आहेत. डोपिंग टेस्टमध्ये खेळाडू दोषी आढळला तर त्याला तात्पुरते निलंबित सुद्धा केले जाते. खेळाडूला त्याचं म्हणणं सादर करण्यासाठी परवानगी दिली जाते. खेळाडूवर ठराविक कालावधीसाठी बंदी घालण्यात येते. व दोषी असल्यास खेळाडू कडून मिळालेली पदके ही परत घेतली जातात. एवढे कडक निर्बंध असताना देखील खेळाडू डोपिंग कडे का वळतो.? त्याला कोण मुभा देतो? आणि त्याला कोण प्रस्थान देतं? याची सकल चौकशी होणे गरजेचे आहे. 
कुस्ती बरोबरच अनेक खेळांना सुद्धा डोपींगचा विळखा बसलेला आहे. 

 माझ्या महाराष्ट्रातील पैलवानाला नाव कमवण्यासाठी डोपिंग ची गरज नाही त्याच्या शरीरात या मातीने एवढी शक्ती भरलेली आहे की तो डोपिंग केलेल्या पैलवानाला सुद्धा सहज हरवू शकतो. 
    तमाम महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला व माननीय मुख्यमंत्र्यांना या लेखाच्या माध्यमातून मी सांगू शकतो की येणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेपासूनच डोपिंग चाचणी नियमीत करावी . नाडाची टीम आपणाला पाहिजे ते सहकार्य करायला तयार आहे फक्त परिषदेने कडक नियमाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. आज डोपिंग सारख्या महाभयंकर राक्षसाची मजल गावगाड्यातल्या छोट्या छोट्या मैदानापर्यंत पोहोचली आहे. मोठ्यांचं बघून छोट खेळाडू ही तेच करत आहेत. 

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*